Ganesh Jayanti 2022 messages: माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे मेसेज
मुंबई, 3 फेब्रुवारी : भारतात सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात. त्यात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात, आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो. हिंदू कॅलेंडरनुसार नवीन महिनाय सुरू झाला आहे. मार्घ महिन्याला सुरुवात झाली आहे. 4 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती (Ganesh Jayanti 2022) आहे. या दिवसापासून माघी गणेशोत्सवाला सुरुवात होते. हिंदू धर्मात गणेश जयंतीला विशेष महत्त्व आहे. माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा (Happy Maghi Ganeshotsav) देणारे शुभेच्छापत्रे, मेसेजेस सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणारे असेच काही मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या मेसेजेसच्या माध्यमातून तुम्ही माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊ शकतात. (Maghi Ganeshotsav messages, Ganesh Chaturthi HD Images, Happy Ganesh Jayanti, Happy Maghi Ganeshotsav Messages)
|| माघी गणेशोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा || गणपती बाप्पा मोरया
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो; ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना माघी गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा
तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता अवघ्या दिनांचा नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा || गणपती बाप्पा मोरया || || माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा ||
वंदन करतो गणरायाला हात जोडतो वरद विनायकाला प्रार्थना करतो गजाननाला सुखी ठेव नेहमी सर्व गणेश भक्तांना माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास घरात आहे लंबोदराचा निवास दहा दिवस आहे आनंदाची रास || गणपती बाप्पा मोरया || || माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा ||
हार फुलांचा घेऊनी | वाहु चला हो गणपतीला || आद्य दैवत साऱ्या जगाचे | पुजन करुया गणरायाचे || माघी गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा !
फुलांची सुरुवात कळीपासून होते जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते आणि आपल्या कामाची सुरुवात श्री गणेशा पासून होते || गणपती बाप्पा मोरया || || माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा ||
आजपासून सुरू होणाऱ्या माघी गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा || गणपती बाप्पा मोरया ||
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ: | निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा || गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ! सर्व गणेशभक्तांना माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा