मुंबई, 29 जुलै : अंधेरी पश्चिमेतील एका भागात आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात काळा धुराचे लोट दिसत आहे. प्राथमिक माहितीनुसार, अंधेरीतील चित्रकुट नावाच्या स्टुडिओला आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तीन फायर इंजिन आणि पाण्याचे बंब रवाना करण्यात आले आहेत.
बातमी अपडेट होत आहे. अद्याप या आगीबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.