मुंबई, 22 नोव्हेंबर : जगातील सर्वात उंच शिखर असलेलं माऊंट एव्हरेस्ट सर करणे हे प्रत्येक गिर्यारोहकांचं स्वप्न असतं. हे शिखर सर करण्यासाठी ते कित्येक वर्ष सराव करतात. त्यानंतरही अनेकांना या मिशनमध्ये अपयश येतं. अगदी एव्हरेस्टच्या बेस कॅम्प चढणे हे देखील गिर्यारोहकांसाठी मोठं यश मानलं जातं. मुंबई च्या गृहिता विचारेनं वयाच्या आठव्या वर्षीच एव्हेरेस्टचा बेस कॅम्प सर करण्याची विक्रमी कामगिरी केली आहे. इतक्या कमी वयात ही कामगिरी करणारी गृहिता ही पहिली महाराष्ट्रीयन ठरलीय. कसा होता प्रवास? उणे अंश तापमान, थंडगार वारा, गोठलेले पाणी, ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी आणि हवामानातील आव्हानात्मक बदल अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा गृहीता बेसकॅम्प पर्यंत पोहोचली. आठ वर्षांच्या गृहिताचे साहस आणि जिद्द पाहून सगळेच भरवले आहेत. 13 दिवसांचा हा ट्रेक काठमांडूपासून समुद्र सपाटीपासून 1400 मीटर उंच रामेछाप विमानतळापर्यंत चार तासांचा आहे. परळी ते पॅरीस! ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या श्रद्धा गायकवाडची Untold Story समुद्रसपाटीपासून 2843 मीटर उंचीवरील रामेछाप ते लुक्ला ते हा तिनं विमानानं प्रवास केला. फाकडिंग ते 3440 मीटर उंच नामचे बाजार ते 3860 मीटर टिंगबोचे ते 4410 मीटर डिंगबोचे ते 4910 मीटर लोबूचे ते 5140 मीटर गोरक्षेप ते 5550 मीटर कालापथर आणि अखेरीस 5864 मीटर उंचीचा एव्हरेस्ट बेस कॅम्प अशी चढाई होती. अनेक किल्ले केले सर गृहितानं कळसुबाई,नवरा नवरी, मलंगगड,भीमाशंकर, स्कॉटीश कडा,सांधन व्हॅली असे बरेच गड सर केले आहेत. विशेष म्हणजे तीने नवरा नवरी गड नऊवारी साडी नेसून सर केला. एव्हरेस्ट सर करण्यासाठी एक ते दीड वर्षांपासून ती तयारी करत होती. घरी येताना आणि जाताना लिफ्टचा वापर टाळणे, रोज चालणे वाढवणे, गड किल्ले सर करणे अशी तिची तयारी सुरु होती. Video : हॉलिवूड थक्क होईल असे स्टंट करणारा मराठी तरूण तिकडं खूप बर्फ आणि थंडी होती. मी पाच लेअरचे कपडे घालून चालायचे. मी पहिल्यांदा बर्फाचे डोंगर पाहिले, गाढव, घोडे आणि याक सुद्धा बघितले. माझी या ट्रेकमध्ये खूप दमणूक झाली, पण तितकीच मज्जाही आली. मला हा ट्रेक पूर्ण करायचा होता म्हणून मी जिद्दीने बेसकॅम्प पर्यंत पोहोचले असं गृहितानं सांगितलं.