मुंबई, 21 ऑक्टोबर : दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा आनंद उत्सवाचा सन. हिंदु धर्मामध्ये
दिवाळी
ला सर्वात अधिक महत्व आहे. हिंदु धर्मातील पवित्र सन म्हणूण दिवाळी हा सण साजरा केला जातो. अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात देखिल अनेक भारतीय लोक दिवाळीचा सण साजरा करीत असतात. दिवाळी म्हणजे फराळ, रांगोळी , आकाशकंदील आणि कपडे खरेदी आलीच. याच पार्श्वभूमीवर दिवाळीनिमित्त दादरच्या बाजारपेठेत लहान मुलांसाठी कपड्याचे विविध प्रकार सध्या उपलब्ध झाले असून या ठिकाणी कपडे खरेदीसाठी मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. कोणत्या कपड्यांना मागणी? मुंबईतील दादरच्या बाजारपेठेत लहान मुलांसाठी शर्ट, सिल्कचा कुर्ता, आणि फॉर्मल शर्ट तर लहान मुलींसाठी लहंगा, शरारा, गरारा, प्लाझो असे विविध प्रकार दादरच्या बाजारपेठेत पाहायला मिळतं आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी सिल्कचा कुर्ता आणि त्यावर पेन्सिल पँट प्रकार ट्रेंडमध्ये आहे. तर मुलींसाठी शरारा, गरारा हा प्रकार ट्रेंडमध्ये आहे. हेही वाचा :
Diwali 2022 : दिवाळीत बनवा आजवर कधीही न खालेल्ला दळाचा लाडू, पाहा Recipe Video काय आहे किंमत? आमच्याकडे विविध प्रकराचे लहान मुलांसाठी कपडे उपलब्ध असून यामध्ये लहान मुलांसाठी शर्ट, सिल्कचा कुर्ता, आणि फॉर्मल शर्ट तर लहान मुलींसाठी लहंगा, शरारा, गरारा, प्लाझो असे विविध प्रकारचे कपडे आहेत. या कपड्यांची किंमत 300 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत आहे. यावर्षी लोकांची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत कपडे खरेदीला मोठ्या प्रमाणात आहे, असं विक्रेते महेश शाह यांनी सांगितले. हेही वाचा :
Diwali Shopping : दिवाळीनिमित्त घर सजावटीसाठी तोरण हवंय? इथे पाहा नवे ट्रेंड, Video सध्या दिवाळीनिमित्त ग्राहकांचा कपडे खरेदीला चांगला प्रतिसाद पाहिला मिळत आहे. आम्ही लहान मुलांपासून ते 15 वयोगटातील मुलांसाठी विविध प्रकरचे कपडे विकण्यासाठी ठेवले आहेत, असं विक्रेते रोहित जयस्वाल यांनी सांगितले.
गुगल मॅपवरून साभार कुठे कराल खरेदी? दादर मार्केट, निअर कबुतर खाना, दादर पश्चिम, दादर, मुंबई, महाराष्ट्र 400028