JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सायरस मिस्त्रींचा अपघात रोखता आला असता? मर्सिडीजच्या तपासासाठी हॉगकाँगहून टीम ठाण्यात

सायरस मिस्त्रींचा अपघात रोखता आला असता? मर्सिडीजच्या तपासासाठी हॉगकाँगहून टीम ठाण्यात

इतक्या महागड्या आणि सुरक्षित कारमध्ये असतानाही सायरस मिस्त्री यांचा मृत्यू कसा झाल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 सप्टेंबर : टाटा सन्सचे माजी चेअरमॅन सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये एक रस्ते अपघातात मृत्यू झाला. हा अपघात झाला तेव्हा त्यांची डॉक्टर अनाहिता पंडोलो कार चालवत होत्या. हा अपघात इतका भीषण होता की, मागे बसलेले सायरस मिस्त्र आणि जहांगिर पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालवणाऱ्या अनाहिता आणि शेजारी बसलेले त्यांचे पती दोघेही जखमी झाले. या अपघातानंतर मर्सिडीजवरुन अनेक सवाल उपस्थित केले जात होते. इतक्या महागड्या आणि सुरक्षित कारमध्ये असतानाही सायरस मिस्त्री यांचा मृत्यू कसा झाल, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या कारभोवती अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. मिस्त्री आणि TATA यांचा वाद काय होता? कोण जिकलं खटला? नंतर रतन टाटांनी केला मोठा बदल ही दुर्घटनाग्रस्त कारचा तपास करण्यासाठी मर्सिडीज बेन्जच्या विशेषज्ञांची एक टीम मंगळवारी ठाण्यात पोहोचली. दुर्घटनाग्रस्त कार ठाण्यातील शोरूममध्ये ठेवण्यात आली आहे. दोन जणांची टीम हॅागकाँग येथून ठाण्यात दाखल झाली आहे. सकाळी १० वाजल्यापासून ही टीम ठाण्यात दाखल झाली आहे. ही टीम सध्या ठाण्यातील घोडबंदर येथील मर्सडिज शोरुममध्ये आहेत. अपघातग्रस्त गाडीचं इन्सेपेक्शन केलं जात आहे. सोबतच पालघर पोलीस दलाचे ३ अधिकारी दाखल झाले आहेत. सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचं खरं कारण समोर, शवविच्छेदन अहवालातून झालं उघड दोन दिवस हा तपास करण्यात येणार आहे. या अपघाताचे कारण आणि गाडीत असताना मृत्यू कसा झालायाचा तपास केला जात आहे. याशिवाय हे रोखता कसं येईल, याबाबतची तपास केला जात आहे. सायरस मिस्त्री यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट शवविच्छेदन अहवालानुसार या अपघातात सायरस मिस्त्री यांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाली होती. ज्याला वैद्यकीय भाषेत पॉलीट्रॉमा म्हणतात. त्यामुळे सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालावरून मर्सिडीज कारच्या भीषण अपघाताचा अंदाज लावता येईल की, गाडीचा वेग किती जास्त असू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या