मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईकरांसाठी डबल धमाका असणार आहे. गारेगार प्रवास आणि तोही डबल डेकरमधून त्यामुळे ही मोठी आनंदाची बातमी आहे. मुंबईमध्ये पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस तयार आहे. ती लवकरच मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आहे. उद्या याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होणार असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या 400 हून अधिक सिंगल इलेक्ट्रिक बस उपलब्ध आहेत. मात्र आता डबल डेकर इलेक्ट्रिक बसेसही मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत. 2028 पर्यंत सगळ्या बस या इलेक्ट्रिकमध्ये करण्याचा मानस आहे. या डबल डेकर बसमध्ये साधारण 78-90 प्रवासी बसू शकतात. या इलेक्ट्रिक बस इलेक्ट्रिक सिटी आणि हायड्रोजवर चालणार आहेत.
या डबल डेकर बसमध्ये साधारण 78-90 प्रवासी बसू शकतात. या इलेक्ट्रिक बस इलेक्ट्रिक सिटी आणि हायड्रोजवर चालणार आहेत. 55 जागा निवडण्यात आल्या आहेत जिथे या इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. पुढच्या तीन ते चार महिन्यात चार्जिंग स्टेशन देखील उभारण्यात येतील अशी माहिती BEST चे जनरल मॅनेजर लोकेश चंद्रा यांनी दिली आहे.