मुंबई, 4 सप्टेंबर : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि मोठे उद्योगपदी सायरस मिस्त्री यांचा पालघर येथे अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांच्या कारला हा अपघात घडला होता. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मर्सिडीज गाडी डिव्हायरडला धडकल्याने अपघात झाला होता. गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुप्रीम कोर्टाने टाटा सन्सला सर्वात मोठा दिलासा देत सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय कायम ठेवला होता. गेल्या अनेक वर्षांपासून टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये न्यायालयीन संघर्ष सुरू होता.