JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोकणी संस्कृतीसाठी सोडली नोकरी, सातासमुद्रापार पोहचली शैलेशची कीर्ती, VIDEO

कोकणी संस्कृतीसाठी सोडली नोकरी, सातासमुद्रापार पोहचली शैलेशची कीर्ती, VIDEO

चित्रकार शैलेश गुरव आपली संस्कृती, आपला निसर्ग, आपले गाव, कोकणातील माती यांची ओळख सातासमुद्रापार पटवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 नोव्हेंबर : आपली कला आपली संस्कृती जपणारी फार कमी लोक समाजात आपल्याला पाहायला मिळतात. पण संस्कृती पटवून दिली पाहिजे हे प्रत्येकाला वाटते. मात्र, बोटावर मोजण्याइतकेच लोक त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली लोरे नं. 1 या गावातील शैलेश गुरव हा होतकरू तरुण त्यापैकी एक आहे. आपली संस्कृती, आपला निसर्ग, आपले गाव, कोकणातील माती यांची ओळख सातासमुद्रापार पटवून देण्यासाठी अवघ्या वयाच्या 25 व्या वर्षी शैलेश गुरव चित्रकले मार्फत प्रयत्न करत आहे. अँक्रिलिक चित्र आणि रंगसंगतीतून शैलेश गेली 7 वर्षे मुंबई सारख्या शहरातून आपल्या मातीची, संस्कृतीची जाण चित्रा मार्फत ठेवत आहे. नोकरी सोडत पूर्णवेळ पेंटिंग करण्याचा निर्णय  कोंकणात चित्रकार शैलेश गुरव याचे बालपण गेले. पुढे शालेय जीवनात मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात आल्यावर कलेविषयी अधिक उत्साह त्याच्यामध्ये आला. पुढे शालेय जीवन संपल्यावर 2 वर्षांचा अँनिमेशन कोर्स करत त्याद्वारेच अंधेरी येथे 2 वर्षे एका चांगल्या कंपनीत शैलेशने नोकरी केली. पण नोकरी, प्रवास आणि पेंटिंग याची योग्य सांगड घालणे अशक्य होत असल्याने चांगल्या पगाराची नोकरी सोडत पूर्णवेळ पेंटिंग करण्याचा निर्णय शैलेशने घेतला. यासाठी चित्रकार निलेश निकम यांच्याकडून त्यांनी पेंटिंग्सच्या विविध प्रकारांचे धडे घेतले. पूर्णवेळ सराव करत पोट्रेट चित्रे आपण खात्रीशीर रेखाटू शकतो. त्यातील बारकावे देखील सहज रेखाटू शकतो हा आत्मविश्वास शैलेशला आला.

झोपडी ते ताज पॅलेस : ‘मला पैसे नकोत तर…’ कोळीवाड्यातील तरूणाने जिंकलं टाटांचं मन, Video

अनेक विषयांतर्गत पेंटिंग्सद्वारे कोंकणातील संस्कृती दर्शवली  लहानपणापासूनच समुद्र, कोकणचा पेहराव, खाद्यसंस्कृती, सण -उत्सव, निसर्ग याविषयी अभिमान आणि आपुलकी असल्याने शैलेशने विषयानुरूप चित्रनिर्मिती केली. त्याने नंदीबैल, शेतकऱ्याची बैलांसोबत शेतीत सुरू असलेली कामे, गायी व वासराचे निरागस प्रेम, शेतकऱ्याकडील नष्ट होत असलेल्या दुर्मीळ वस्तू, असे अनेक विषयांतर्गत पेंटिंग्सद्वारे त्याने कोंकणातील संस्कृती दर्शवली आहे. तर कधी नागरी व ग्रामीण दैनंदिन जीवनाचे प्रतिबिंब दिसेल अशी पेंटिंग्स साकारली.

सिटी बजाके बोल… मुंबईकर निखिलनं शिटी वाजवून उंचावली देशाची मान, पाहा Video

संबंधित बातम्या

त्याचे पहिले चित्रप्रदर्शन वरळीतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे 2019 मध्ये भरले. त्यानंतर शैलेशने मागे वळून पाहिले नाही. काही पेंटिंग्सना रसिकांची कौतुकाची थाप देखील मिळाली. याची आणखी एक पोचपावती म्हणजे त्याची काही चित्र चक्क लंडनमधील नागरिकांनी विकत घेतली आणि या चित्रांना आजनूही विदेशात मागणी आहे. आतापर्यंत शैलेशने 200 हून अधिक पोट्रेट साकारली असून 2018 मध्ये मुंबई आर्ट फेस्टीव्हलच्या विशेष पारितोषिकाचा तो मानकरी ठरला आहे. तर आपली संस्कृती जपण्यासाठी जिद्दीने प्रवास करणाऱ्या शैलेशने अलीकडेच विरार येथे ‘‘अंतरंग’’ नावाचा स्वतःचा स्टुडिओ सुरु केला आहे. याठिकाणी तो स्वतः सराव करत विद्यार्थ्यांचे पेंटिंग्सचे क्लासेसही घेत आहे. आपल्या कौशल्यावर सर्वकाही अवलंबून नोकरी- व्यवसाय करायला हवा अशा प्रतिक्रिया येतात. पण माझं म्हणणं आहे की आपल्या कौशल्यावर सर्वकाही अवलंबून आहे. दुर्लक्षित होत चाललेली कोकणातील संस्कृती जपणे आणि त्या संस्कृतीचे दर्शन सर्वांना चित्रातून घडवणे यासाठीच माझी धडपड आहे, असं  शैलेश गुरव सांगतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या