JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / झोपडी ते ताज पॅलेस : 'मला पैसे नकोत तर...' कोळीवाड्यातील तरूणाने जिंकलं टाटांचं मन, Video

झोपडी ते ताज पॅलेस : 'मला पैसे नकोत तर...' कोळीवाड्यातील तरूणाने जिंकलं टाटांचं मन, Video

टाटांना त्याची परिस्थिती समजताच त्यांनी त्या तरुणाला आर्थिक मदत देऊ केली. पण, त्याने मदतीचा चेक नाकारूनही टाटांचे मन जिंकले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 नोव्हेंबर : मुंबईतल्या कफ परेड भागातील कोळीवाड्यात तो राहतो. 9 वी नंतर त्याची शाळा सुटली. वयाच्या तिशीत असलेल्या त्या तरुणाला घर चालवण्याची चिंता होती. परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सुटलेल्या तरुणाला चित्रकलेचं शास्त्रीय शिक्षण मिळणं ही तर लांबची गोष्ट. पण, त्यानं त्याच्यातील कला जिवंत ठेवली. या चित्रकलेच्या जोरावर ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांना प्रभावित केलं. टाटांना त्याची परिस्थिती समजताच त्यांनी त्या तरुणाला आर्थिक मदत देऊ केली. पण, त्याने मदतीचा चेक नाकारूनही टाटांचे मन जिंकले. कसा सुरु झाला प्रवास? मुंबई तील 29 वर्षांचा तरुण चित्रकार निलेश मोहिते याचा हा प्रवास आहे. आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या निलेशच्या छोट्याश्या घरात सर्वत्र फक्त पेंटिंग्ज दिसतात. त्याला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. शाळेत एका राज्यस्तरीय स्पर्धेत त्यानं दुसरा क्रमांकही मिळवला होता. निलेश शाळेत असताना जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये दिग्गज चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या चित्राचं प्रदर्शन भरलं होतं. त्यावेळी निलेश हुसेन यांना जाऊन भेटला. त्यांना चित्राची फाईल दाखवली. हुसेन यांनीही निलेशचं कौतुक केलं. या शबासकीनंतर त्यानं कधीही चित्रकलेला अंतर दिलं नाही. आईच्या आजारपणामुळे निलेशचं शिक्षण सुटलं. तो पार्ट टाईम नोकरी करु लागला. त्या खडतर परिस्थितीमध्येही तो चित्रं काढत होता. Video : अपूर्ण स्वप्नाला मिळाले पतीचे बळ, शून्यातून सुरुवात करत बनली 4 कंपन्यांची मालकीण कशी झाली टाटांची भेट? निलेश लहानपणापासूनच ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना आयडॉल मानतो. टाटांना भेटण्याची त्याची तीव्र इच्छा होती त्याने रतन टाटांचे चित्र सुद्धा रेखाटले होते. तो वेळ मिळेल तसं टाटांच्या घराजवळ त्यांना भेटण्यासाठी उभारत असे. त्याने जवळपास वर्षभर या पद्धतीनं टाटांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. अखेर एका ओळखीच्या व्यक्तीनं त्याचं स्वप्न पूर्ण केलं. निलेश रतन टाटांना त्यांच्या वाढदिवशी भेटला. निलेशनं टाटांना त्यांचं पेन्टिंग गिफ्ट दिलं. ही ओळख पुढे वाढत गेली. निलेशनं नाकारला चेक निलेशनं रतन टाटांना त्यांच्या वाढदिवशी साडेसहा फुट पेंटिंग गिफ्ट केलं. हे अप्रतिम चित्र त्यांना खूप आवडलं. यावेळी त्यांनी निलेशला शाबासकीची थाप तर दिली. निलेशनं हे चित्र अगदी लहान खोलीत काढल्याचं टाटांना समजलं. त्यावेळी त्यांनी त्याला या चित्राचा मोबदला म्हणून एक चेक देऊ केला. पण, निलेशनं नम्रपणे टाटांची मदत नाकारली आणि त्यांना एक संधी मागितली. दहावीतच दृष्टी गेली पण हार मानली नाही, जिद्दीनं मिळवली सरकारी नोकरी! निलेशला टाटांनी संधी दिली. त्याच्या चित्राचं पहिलंच प्रदर्शन ताजमध्ये भरलं. या प्रदर्शनासाठी त्यानं खूप मेहनत घेतली. 1 वर्षाचं काम 2-3 महिन्यांमध्ये पूर्ण केलं. ताज हॉटेलच्या एक्झिबिशन हॉलमध्ये भरलेल्या त्याच्या प्रदर्शनाला चांगली दाद मिळाली.  आजपर्यंत जे स्वप्नात होतं ते सत्यात उतरलं आहे. मी आता पूर्णवेळ चित्र काढण्याचंच काम करणार आहे. रतन टाटांनी दिलेल्या संधीमुळे मी खूप नशिबवान ठरलो. माझ्या मित्रांनी सुद्धा मला खूप प्रोत्साहन दिले, अशी भावना निलेशनं व्यक्त केली. संपर्क क्रमांक - निलेश मोहिते, 8169318784

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या