JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अभिनेते शरद पोंक्षे यांचं हिंदू समाजाबाबत मोठे विधान, म्हणाले.. समाज अहिंसक होता, पण..

अभिनेते शरद पोंक्षे यांचं हिंदू समाजाबाबत मोठे विधान, म्हणाले.. समाज अहिंसक होता, पण..

actor sharad ponkshe : आम्हाला राग येत नाही, चिड येत नाही. कारण आम्हाला शौर्याचा इतिहास शिकवला. रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळालं हे आम्हाला खरं वाटतं. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले आहे त्यांचा हा घोर अपमान आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 ऑगस्ट : अभिनेते शरद पोंक्षे यांच्या वक्तव्यावरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. पोंक्षे यांनी घेतलेल्या सावरकरांच्या भूमिकेवरुनही त्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. आता पुन्हा एकदा असाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अहिंसा परमो धर्म: यामध्ये केवळ अर्धाच श्लोक आम्हाला शिकवला गेला. अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि या सर्वश्रेष्ठ धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र उचलणे हा त्याही पेक्षा मोठा धर्म आहे हे आम्हाला शिकवलं नाही. अहिंसेसारखे दुसरे शस्त्र नाही. अहिंसा परमो धर्म:चे एवढे डोस आम्हाला पाजले की हा हिंदू समाज अहिंसक होता होता नपुसंक कधी झाला हेच आम्हाला कळले नाही. असे मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात मांडले. आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला : पोंक्षे आम्हाला राग येत नाही, चिड येत नाही. कारण आम्हाला शौर्याचा इतिहास शिकवला. रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळालं हे आम्हाला खरं वाटतं. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले आहे त्यांचा हा घोर अपमान आहे. राष्ट्राला सर्व विचारांची गरज असते, पण ती तेवढ्याच प्रमाणात. हिंदूस्थान हा हिंदूंचा आहे, यामध्ये कम्युनिझम, समाजवाद हवा, तो नसून चालत नाही. पण त्यांचे प्रमाण ठरलेले आहे हे त्या राजाला कळते जो सुसंस्कृत असतो. तो कधी कोणते उपोषण होऊ देत नाही. उपोषण हा कधीच मार्ग नाही. उपोषण तेव्हाच यशस्वी होते जेव्हा राजा सुसंस्कृत असतो. सुसंस्कृत राजा असणे म्हणजे काय? एक प्रभू श्रीरामांचे रामराज्य व दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य. असे राज्य चालविणारा राजा असावा, असे पोंक्षे म्हणाले.

नेताजींची मुलगी अनिता बोस यांची खास मागणी; म्हणाल्या DNA चाचणी करा अन्..

संबंधित बातम्या

तोपर्यंत सावरकर काँग्रसमध्ये कधीही येऊ शकत नाही : पोंक्षे हिंदी राष्ट्रवाद हा अत्यंत घातक आहे. मुस्लिम लांगुलचालन हे अत्यंत घातक आहे. हे दोन मुद्दे जोपर्यंत काँग्रेस सोडत नाही तोपर्यंत हा सावरकर काँग्रसमध्ये कधीही येऊ शकत नाही. काँग्रेस सरकारने हिंदूत्वापासून सर्वांना दूर केले. मात्र, आता खरे दिवस यायला लागले आहेत, असेही ते म्हणाले. ब्राह्मण सभागृह येथे रविवारी पार पडलेल्या या व्याख्यानात सावरकर अभ्यासक ज्येष्ठ वक्ते शरद पोंक्षे यांनी सावरकरांविषयी आपले विचार मांडले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या