मुंबई , 20 ऑगस्ट : मुंबईत ( Mumbai ) पावसाळ्यात जुन्या इमारती ( Old Buildings ) कोसळून जीवितहानी होण्याच्या घटना नेहमी घडतात. मुंबई शहरात व्यवस्थित निवारा मिळत नाही म्हणून अनेक कुटुंबे स्वतःचा जीव धोक्यात घालून धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत. गोरेगाव ( Goregaon ) मधील जयप्रकाश नगर येथे अशीच सफाई कर्मचाऱ्यांची 40 कुटुंबे या धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत. रात्री झोपल्यानंतर सकाळचा दिवस दिसेल की नाही अशी भीती येथील राहणारे स्थानिक सफाई कर्मचारी व्यक्त करत आहेत. स्थानिक प्रशासन तसेच पालिका प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप या ठिकाणी राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी केला आहे. सतीश कदम गेले अनेक वर्षे सफाई कामगार म्हणून काम करतात. सतीश म्हणाले कदम की, आमच्या पिढ्या न पिढ्या येथे राहतात. 1950 साली येथे झोपडपट्टी होती मात्र 1960 साली येथे इमारत बांधण्यात आली. गेले अनेक वर्षे आम्ही येथे राहत आहोत मात्र जुन्या अणि जीर्ण झालेल्या या इमारतीत आम्हाला राहावे लागते. कधी इमारत कोसळेल अन आमचं जीव जाईल याची शास्वती नाही. पूर्ण सोसायटी मधील इमारत जीर्ण झाली आहे. बाथरूम सीलिंग याची हालत फारच भयानक आहे. हेही वाचा : Nashik : महिलांनी एकत्र येत स्वयंरोजगारातून उभारला व्यवसाय; आता होतीय लाखोंची कमाई इतके कमी पैसे परवडत नाहीत पालिकेने आश्रय योजने अंतर्गत या इमारतीचा पूर्नविकास करण्याचं ठरविलं आहे. पालिका स्थलांतरीत कामगारांना 75 हजार डिपॉझिट तसेच दरमहा 14 हजर रूपये भाडे देणार आहे. मात्र इतके कमी पैसे परवडत नसल्याचे सफाई कामगारांचे म्हणणे आहे. सफाई कामगार घनश्याम राजपूत म्हणाले की, आमच्या पिढ्या न पिढ्या येथे राहतात. माझे आजी आजोबा पूर्वी 1950 साली झोपडी बांधून राहत होते. त्यानंतर 1960 साली येथे बिल्डिंग झाली मात्र अजुनही मालकी हक्काच घर आम्हाला मिळाले नाही. इथल्या घराची हालत इतकी वाईट आहे की आम्ही रात्री झोपतो तर आम्हाला वाटत की आमची सकाळ उजडेल का नाही? इतकी खराब स्थिती या ठिकाणची आहे. सफाई कामगार मालकी घर समितीचे अध्यक्ष भरत सोलंकी म्हणाले की, धोकादायक इमारती कोसळून अनेकांना स्वतःचे जीव गमवावे लागते. याबाबत आम्ही पालिकेला विचारणा केली आहे. इथली 40 कुटुंबे स्वतः चा जीव धोक्यात घालून जीवन जगत आहेत. आम्हाला पालिकेने 75 हजार डिपॉझिट रुपये तसेच 14 हजार भाडे देऊ केले आहेत. त्यामध्ये पण 5 हजार रूपये पगारातून कपात होनार आहेत. हे असं काय परवडणार नाही. या भागात डिपॉझिट लाखात आहे भाड देखिल खूप आहे. त्यामुळे परवडत नाही. पालिका प्रशासनाने अधिक पैसे आम्हाला द्यावे ही आमची मागणी आहे. हेही वाचा : Nashik : अंध असूनही इतरांना करतात मदत, आजवरचा प्रवास वाचून वाटेल अभिमान दरम्यान, या संदर्भात आम्ही पलिकेला विचारणा केली असता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की प्रक्रिया करण्याचं काम सुरू आहे. लवकरात लवकर यातून मार्ग निघावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यांना तात्काळ घरे मिळावीत यासाठी देखिल आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यानं दरमहा 14 हजार भाडे तसेच 75 हजार डिपॉझिट मिळेल.