JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची ठाणेकरांना दिवाळी भेट, मुंबईपेक्षा ठाण्याचे महत्त्व वाढणार 17 हजार कोटींची कामे होणार

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची ठाणेकरांना दिवाळी भेट, मुंबईपेक्षा ठाण्याचे महत्त्व वाढणार 17 हजार कोटींची कामे होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या ठाणे जिल्ह्यात विकासकामांना गती येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणेकरांना दिवाळी भेट देण्याचे ठरवले आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 12 ऑक्टोंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या ठाणे जिल्ह्यात विकासकामांना गती येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणेकरांना दिवाळी भेट देण्याचे ठरवले आहे. ठाणे जिल्ह्यात  विविध विकास कामांसाठी तब्बल 17 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकून 21 प्रकल्पांची कामे होणार आहेत. ठाणे ते नवी मुंबई या भागात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मोठा प्रकल्प होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याचबरोबर नवीन बोगदे, उड्डाणपूल, रस्ते बांधले जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमआरडीएच्या माध्यमातून ठाण्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांवर भर दिला आहे. ठाण्यासह परिसरातील वाहतूककोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एमएमआरडीएकडून 17 हजार कोटी रुपयांचे तब्बल 21 प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे ठाणे आणि परिसरात होणाऱ्या कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे. ठाणेकरांना वाहतुक कोंडीत न अडकण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून या प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाणार आहे. अशा आशयाचे पत्र एमएमआरडीएला देण्यात आले आहे.

हे ही वाचा :  उद्धव ठाकरेंची डोकेदुखी पुन्हा वाढली, धनुष्यबाण गेलं आता मशाल चिन्हावर ‘या’ पक्षाचा दावा

संबंधित बातम्या

असे आहेत प्रस्तावित पूल व प्रकल्प

कोपरी ते पोटणी खाडीपूल - 6 पदरी - लांबी 1 किमी - 333 कोटी, गायमुख ते भिवंडीदरम्यान तीन खाडीपूल - 1698 कोटी, ठाणे कोस्टल रोड भाग 2 - गायमुख ते फाउंटन हॉटेल 5.36 किमी लांबीचा रस्ता आणि खारेगाव ते कोपरी 7.34 किमी लांबीचा रस्ता - 2107 कोटी, मुरबे ते सातपाटी (पालघर) खाडीवर नवीन पुलाची बांधणी. लांबी 3 किमी - 365 कोटी रुपये. शिळ फाटा ते माणकोली - 9 किमीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण. उल्हास नदीवर 1.6 किमीचा खाडीपूल, देसाई खाडीवर 70 मीटर लांबीचा पूल, दिवा पूर्व आणि पश्चिम जोडणीसाठी 610 मीटर लांबीचा उड्डाणपूल - 1440 कोटी रुपये खर्च.

जाहिरात

कल्याण ते माणकोली (बापगांव) गांधारी खाडीवरील सद्यस्थितीतील दोन पदरी पुलाचे चौपदरीकरण. गांधारी पुल ते राष्ट्रीय महामार्ग दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण करून काँक्रीटीकरण करणे - 400 कोटी रुपये. शिळ फाटा ते माणकोली - 9 किमीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण. उल्हास नदीवर 1.6 किमीचा खाडीपूल,  ठाण्यातील दहिसर ते महापे नवीन बोगदा, नवी मुंबई, कल्याण, अंबरनाथ. कुळगाव, बदलापूर आणि पडघा यांना जोडणारा महानगरातील प्रादेशिक मार्ग प्रस्तावित - 1558 कोटी रुपये.

जाहिरात

हे ही वाचा : ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं; अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट

दहिसर ते मुरबाड रस्ता - 40 किमीचा रस्ता - 3372 कोटी रुपये, टिटवाळा ते बदलापूर रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण - 959 कोटी रुपये, वसई ते पालघर नारींगी खाडीवर दुपदरी पूल - 4.56 किमी लांबी - 645 कोटी रुपये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या