02 सप्टेंबर : विक्रोळी ते घाटकोपर दरम्यान स्लो ट्रॅकवर ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून ठाण्याहुन CST कडे जाणारी वाहतुक सुरू झाली आहे. सकाळी 11च्या सुमारास दुरुस्तीचे काम झाल्यावर सुमारे सव्वा अकराच्या सुमारास या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू झाली. मात्र, ऐन सकाळच्यावेळी लोकलसेवा ठप्प झाल्याने चाकरमान्यांचा मोठा खोळंबा झाला तसचं मध्य रेल्वेच्या सर्व स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.
तांत्रिक बिघाड दुरूस्त होईपर्यंत अप आणि डाऊन लाईन बंद करण्यात आली असून स्लो ट्रॅकवरील गाड्या फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे गाड्या अर्धा तास उशिराने धावत होत्या. वाहतूक विस्कळीत झाल्याने कामासाठी निघालेल्या मुंबईकरांचा मोठा खोळंबा झाला आहे. स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली असून ऐन पावसातच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बेस्ट प्रशासनाकडे बेस्ट बसकडे मदत मागितली होती. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++