मुंबई, 18 ऑगस्ट: कोकणात हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी एक संशयास्पद बोट आढळून आली. या बोटीत AK 47 सह शस्त्रास्त्रं सापडल्याने खळबळ उडाली. या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पण या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात High Alert जारी करण्यात आला आहे. कोकणातून मुंबईत येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू झाली आहे. AST ने हरिहरेश्वर किनारी सापडलेल्या या बोटीची प्राथमिक पाहणी केली. यामध्ये दहशतवाद्यांचा संबंध नसल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने हाय अलर्ट जारी करत नाकाबंदी केली आहे. कृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी आणि जवळ आलेला गणेशोत्सव यामुळे कोकणात उत्साहाचं वातावरण आहे. अनेक चाकरमाने दहीहंडीची लागून सुट्टी मिळाल्याने कोकणाकडे धावत आहेत. लाँग वीकएंड आणि कमी झालेला पाऊस यामुळे पर्यटकांचीही रीघ कोकण किनाऱ्यांकडे लागली आहे. मुंबई-गोवा हायवे त्यामुळे आधीच फुललेला दिसून येतोय. त्यात नाकाबंदी आणि रेड अलर्ट जारी झाल्याने वाहनांची रीघ लागण्याची शक्यता आहे. माणगाव इथे पोलिसांनी प्रथम तपासणी कारवाईला सुरुवात केली.
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीमध्ये . या संशयास्पद बोटीमध्ये 3 एके 47 रायफल्स आणि 225 राऊंडस आढळून आले आहे. संशयास्पद बोट पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. ही बोट मस्कतहून युरोपला जात होती. ऑस्ट्रेलियन महिलेची ही बोट होती, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
वाचा - हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट, काय आहे 1993 ब्लॉस्टशी कनेक्शन?सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी म्हणून नाकाबंदी करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बोटीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तटरक्षक दलाकडून या बोटीबद्दल प्रथम माहिती मिळाली. या बोटीवर कोणीही माणूस दिसून आलेला नाही. सुरुवातीला ही बोट ओमानची होती, अशी माहिती समोर आली होती.