JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद

मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद

मुंबई-गोवा महामार्गावरुन जाताना तुम्ही जर परशुराम घाटातून जाण्याचा विचार करत असाल तर थांबा

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : अगदी दोन दिवस जरी सुट्टी असेल तरी लगेच गावची वाट धरली जाते. अशावेळी जर तुम्ही मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन जाताना तुम्ही जर परशुराम घाटातून जाण्याचा विचार करत असाल तर थांबा, आताच तुमचा प्लॅन रद्द करा किंवा बदला. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्याच्या कामादरम्यान डोंगराची माती रस्त्यावर आली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.

खोपोलीत भीषण अपघात चालकाला डुलकी लागली आणि भयंकर घडलं, पाहा PHOTO

संबंधित बातम्या

घाटाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. दोन्ही बाजूची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. मात्र प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने चाकरमन्यांचे हाल झाले आहेत. त्यामुळे तुम्ही जर या मार्गाने विकेण्डला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हा रद्द करा किंवा बदलला नाहीतर तुम्हीही असे अडकू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या