मुंबई, 29 जुलै: दहावीचा निकाल बुधवारी आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत mahresult.nic.in वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. याशिवाय न्यूज 18 लोकमतवरही हा निकाल पाहू शकणार आहात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आली होती. या निकालाचे सर्व अपडेट्स जाणून घ्या.