JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / vinayak raut vs uday samant : उदय सामंत जरा जास्तच ढवळाढवळ करतात विनायक राऊतांनी सामंतांचा घेतला समाचार

vinayak raut vs uday samant : उदय सामंत जरा जास्तच ढवळाढवळ करतात विनायक राऊतांनी सामंतांचा घेतला समाचार

शिंदे गट आणि शिवसेनेत चांगलाच कलगीतुरा रंगत आहे. मागच्या काही दिवसांपासून शिंदे गटातील नेत्यांना शिवसेनेकडून जोरदार टीकास्त्र सोडण्याचे काम सुरू आहे. (vinayak raut vs uday samant)

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिंधुदुर्ग, 11 सप्टेंबर : शिंदे गट आणि शिवसेनेत चांगलाच कलगीतुरा रंगत आहे. मागच्या काही दिवसांपासून शिंदे गटातील नेत्यांना शिवसेनेकडून जोरदार टीकास्त्र सोडण्याचे काम सुरू आहे. दरम्यान कोकणतही शिंदे गट विरुद्ध शिवसेना हा वाद जोरदार पहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत बंडखोर आमदार उदय सामंत यांच्यावर टीका करण्याच्या सपाटाच लावला आहे. दरम्यान खासदार राऊत यांनी मालवण येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली आहे.

ते म्हणाले कि, शिंदे-फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेत अमिषे दाखवून फोडाफोडी करण्यापेक्षा अन्य पक्षांत असलेल्या आपल्या हितचिंतक व विरोधी पक्षात असताना मदत केलेल्या नातेवाईकांना पहिले शिंदे गटात घ्यावे. मालवण-तळगाव येथील निवासस्थानी खा. राऊत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अमित शहा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे जनतेत प्रचंड रोष आहे.

हे ही वाचा :  तो शब्द कोणी फिरवला? शिवसेनेचा अमित शहांना रोखठोक सवाल

संबंधित बातम्या

ते पुढे म्हणाले कि, शिंदे गटात गेलेले आमदार पुन्हा शिवसेनेत येणार नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत अनेक आमदार घडले आहेत. त्यातील आज शिंदे गटात गेले आहेत. परंतु सर्वांच्या पाठीमागून जाऊन उदय सामंत हे शिवसेनेत फोडाफोडीचे काम करत आहेत. शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांना वेगवेगळी आमिषे दाखवून तुम्ही शिंदे गटात या, असे सांगत आहेत, हा प्रकार चुकीचा आहे. त्यांना एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी हितचिंतक, वेळप्रसंगी कामे केली त्या आपल्या अन्य पक्षात असलेल्या नातेवाईकांना शिंदे गटात घ्यावे, असे खा. राऊत यांनी सांगितले.

जाहिरात

खा. राऊत म्हणाले, शिवसेना पक्षात फोडाफोडी करण्याचा त्यांना अधिकार नाही. कितीही आमिषे दाखवली, काही झाले तरी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक सामंत यांना दाद देणार नाहीत. दीपक केसरकर शिंदे गटात गेले; परंतु त्यांनी शिवसेना संघटनेत गडबड केली नाही. मात्र, उदय सामंत जरा जास्तच ढवळाढवळ करत आहेत.

हे ही वाचा :  ‘उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली’, वरुण सरदेसाईंचा दावा

जाहिरात

आता ते पुन्हा शिवसेनेत येऊ शकत नाहीत

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमचा व शिवसेनेचा सात-बारा एकच आहे, त्यामुळे पुन्हा आम्ही एकत्र येऊ असा दावा केला होता. याबाबत खा. विनायक राऊत म्हणाले, याबाबतची भूमिका भाजपचे नेते अमित शहा यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे काही झाले तरी आता ते पुन्हा शिवसेनेत येऊ शकत नाहीत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या