JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 6 महिन्याची मुलगी आणि 2 वर्षांचा मुलाची हत्या करून आईने जाळले मृतदेह, नांदेड हादरलं

6 महिन्याची मुलगी आणि 2 वर्षांचा मुलाची हत्या करून आईने जाळले मृतदेह, नांदेड हादरलं

मुलगी रडत होती म्हणून तिला मारलं आणि मुलगा खायाला मागत होता म्हणून रागातून हत्या केल्याची कबुली पोलिसांनाा दिली.

जाहिरात

मुलगी रडत होती म्हणून तिला मारलं आणि मुलगा खायाला मागत होता म्हणून रागातून हत्या केल्याची कबुली पोलिसांनाा दिली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नांदेड, 02 जून : मात न तू वैरणी म्हणवणारी संतापजनक घटना नांदेड (Nanded ) जिल्ह्यामध्ये घडली आहे. मुलगा खायला मागतो  आणि मुलगी रडते म्हणून पोटच्या मुला-मुलीची हत्या करून आईनेच (Mother kills girl and 2-year-old boy ) त्यांचे मृतदेह शेतात नेऊन जाळले असल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पांडुरणा या गावात ही घटना घडली. पांडुरणा शिवारात आखड्यावर गणपत निमलवाड आपल्या पत्नी आणि लहान मुला -मुलीसोबत राहत होते. त्यांची 30 वर्षीय पत्नी धूरपता निमलवाड हिने हे कृत्य केले. 2 वर्षाचा मुलगा दत्ता आणि 4 महिन्याची अनुसया या दोघांची तिने हत्या केली. मंगळवारी रात्री पती झोपत असतांना मुला -मुलीला घेऊन धूरपता निमलवाड घराबाहेर पडली. गावाजवळ पुलाखाली नेऊन तिने 4 महिण्याच्या अनुसयाला मारून तिथेच पुरून टाकले. नंतर ती माहेरी ब्राह्मणवाडा इथे गेली. तिथे उसाच्या शेतात नेऊन 2 वर्षाचा मुलगा दत्ता याला देखील मारून टाकलं. ( भयंकर! गरीबांच्या किडनीचा लाखांमध्ये व्यवहार; राजधानीतून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश ) नंतर आपली आई कोंडाबाई राजेमोड आणि भाऊ माधव राजेमोड यांना परत पांडुरणा येथे आणून दोन्ही मुलाचे मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकले. भोकर पोलिसांना खबऱ्या मार्फत ही माहिती मिळाल्याने ही घटना उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी धुरपता निमलवाड हिच्यासह तिची आई आणि भावाला अटक केली. ( बाऊंड्रीवर फिल्डिंग करताना डोकं आपटलं, इंग्लंडच्या खेळाडूला गंभीर दुखापत ) दरम्यान, या महिलेनं मानसिक आजार आणि वेडसरपणातून तिने हे कृत्य केल्याचे नातेवाईक सांगतात. पण मुलगी रडत होती म्हणून तिला मारलं आणि मुलगा खायाला मागत होता म्हणून रागातून हत्या केल्याची कबुली तिने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दोन्ही मुलांच्या हत्येप्रकरणी या महिलेवर गुन्हे दाखल केले आहे.  या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या