JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pathan: ..तेव्हा प्रेक्षकांना हुसकावणारे आव्हाड आज मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपले? 'पठाण'वरून मनसेचा हल्लाबोल

Pathan: ..तेव्हा प्रेक्षकांना हुसकावणारे आव्हाड आज मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपले? 'पठाण'वरून मनसेचा हल्लाबोल

शाहरुख खानचा पठाण चित्रपट सध्या चांगलाच वादात सापडला आहे. या चित्रपटावरून मनसेनं आता थेट जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जानेवारी : शाहरुख खानचा पठाण चित्रपट सध्या चांगलाच वादात सापडला आहे. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला हिंदू संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे पठाण चित्रपटामुळे मराठी चित्रपटांना स्क्रिन्स मिळत नसल्याचा देखील आरोप केला जात आहे. आता या वादात मनसेनं उडी घेतली आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी यावरून राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘हर हर महादेव’ वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले? ‘पठाण’ मुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसताना आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत? असा सवाल करत अमेय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे. नेमकं काय म्हटलं खोपकर यांनी?   अमेय खोपकर यांनी ट्विट करत पठाण चित्रपटावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.  ’ ‘हर हर महादेव’ वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले? ‘पठाण’ मुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसताना आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?’ असा सवाल करत खोपकर यांनी आव्हाडांना टोला लगावला आहे.

संबंधित बातम्या

मनसेचा चित्रपटगृहांना इशारा  दरम्यान याच मुद्द्यावरून मनसेने चित्रपटगृहांना देखील इशारा दिला आहे. पठाण चित्रपटाला विरोध नाही, मात्र त्यामुळे मराठी चित्रपटांच्या स्क्रिन्स आडवल्या जाऊ नयेत. मराठी चित्रपटांना देखील स्क्रिन्स मिळाव्यात असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या