JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...म्हणून शहाजी बापूंनी अधिवेशनाला मारली दांडी, श्री श्री रविशंकर यांच्या शिबिरात जाऊन केलं 'भारी' काम!

...म्हणून शहाजी बापूंनी अधिवेशनाला मारली दांडी, श्री श्री रविशंकर यांच्या शिबिरात जाऊन केलं 'भारी' काम!

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तुरळक हजेरी लावून आमदार शहाजी बापूंनी बंगळुर गाठलं.

जाहिरात

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तुरळक हजेरी लावून आमदार शहाजी बापूंनी बंगळुर गाठलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पंढरपूर, 02 जानेवारी: ‘काय झाडी.. काय डोंगर’ अश्या आपल्या प्रसिद्ध डायलॉगमुळे राज्याच्या राजकारणात वजन वाढवलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी चक्क बंगळुर येथे जाऊन आपले नऊ किलो वजन कमी केले आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तुरळक हजेरी लावून आमदार शहाजी बापूंनी बंगळुर गाठलं. शहाजी बापू यांना गेल्या काही दिवसांपासून वजन वाढल्यामुळे त्रास होत होता. त्यामुळे वजन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले. पण, फारसा फरक पडला नाही. त्यामुळे श्री श्री रविशंकर यांच्या पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया शिबिरात त्यांनी सहभाग नोंदवला. (‘महाराजांबद्दल अजित पवार चुकीचे बोलले’, संभाजीराजेंनी स्पष्ट शब्दात ठणकावलं) समतोल आहार सात्विक ज्ञानसागराचे बौद्धिक, विशिष्ट व्यायाम योग प्राणायाम, उकडलेल्या पालेभाज्या फळभाज्या यांचा स्वाद घेऊन शहाजी बापूंनी शारीरिक वजन कमी केले. मागील 8 दिवसांपासून त्यांनी सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं. अखेरीस 9 किलो वजन कमी केलं आहे. (‘शिंदे गटातील आमदार हे भाजपमध्ये…’, संजय राऊतांचा मोठा दावा) विशेष म्हणजे, वर्षाच्या सुरुवातीलाच आमदार शहाजी बापूंनी हे शिबिर पूर्ण करून आपले नऊ किलो वजन कमी केले आहे. त्यामुळे आपल्या रांगड्या भाषेतील आवाजाचे वजन देखील आगामी काळात आमदार शाहजीबापूंचे नक्की वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या