JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सिद्धिविनायक मंदिराचा मुद्दा आता थेट अधिवेशनात; बांदेकरांच्या अडचणी वाढणार?

सिद्धिविनायक मंदिराचा मुद्दा आता थेट अधिवेशनात; बांदेकरांच्या अडचणी वाढणार?

सिद्धिविनायक न्यास मंदिरातील कारभाराबाबत मनसेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. आता हा मुद्दा आज हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला जाणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 डिसेंबर :  सिद्धिविनायक न्यास मंदिरातील कारभाराबाबत मनसेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. या मुद्द्यावर मनसे आता अधिक आक्रमक झाल्याची पहायला मिळत आहे. मनसे नेते मनोज चव्हाण यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. मात्र दुसरीकडे मनसेकडून आरोप सुरू असताना सिद्धिविनायक न्यास मंदिरचे अध्यक्ष  आदेश बांदेकर यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आता बांदेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आज हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला जाणार आहे . आमदार सदा सरवणकर हे हा मुद्दा सभागृहात उपस्थित करणार आहेत. याबाबत  मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांच्याकडून एक ट्विट देखील करण्यात आलं आहे.

नेमकं काय म्हटलं मनोज चव्हाण यांनी?     मनसेकडून सिद्धिविनायक न्यास मंदिरातील कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. या प्रकरणात आता मनसे नेते मनोज चव्हाण यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. आज हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला जाणार आहे. आमदार सदा सरवणकर हे हा मुद्दा उपस्थित करणार आहेत. याबाबत चव्हाण यांनी एक ट्विट केलं आहे.  ‘सिद्धिविनायक न्यास भ्रष्टाचार शासनदरबारी दाखल, असेच लढत राहणार निर्णय होईपर्यंत खुप खोके, To मातोश्री बंगलो VIA सिध्दीविनायक ट्रस्ट.’ असं ट्विट चव्हाण यांनी केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या