मिलिंद नामदेव शिरसाट असं आत्महत्या करणाऱ्या 45 वर्षीय शिक्षकाचं नाव आहे. (File Photo)
अमरावती, 24 सप्टेंबर: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवरील होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे. देशाला हादरवून सोडणाऱ्या मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 30 जणांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटना ताज्या असताना, अमरावतीतील (Amravati) अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार (Minor girl rape case) प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीनं पोलीस ठाण्यातच गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. अरुण बाबाराव जवंजाळ असं आत्महत्या केलेल्या 50 वर्षीय संशयित आरोपीचं नाव आहे. संशयित आरोपी जवंजाळ याने गुरुवारी दुपारी 4 ते 5 च्या सुमारास अमरावती शहर आयुक्तालयाच्या वलगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात गळफास घेत जीवन संपवलं आहे. त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याचा अधिकृत खुलासा समोर आला नाही. बलात्कार प्रकरणात अटक झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने आरोपीनं आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. हेही वाचा- सातारा: घरात घुसत मुलीचं तोंड दाबून चिरला गळा; एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट बलात्कार प्रकरणातील आरोपी अरुण जवंजाळ यांनी आत्महत्या केल्याचं समजताच, जिल्हा सत्र न्यायाधीशासोबतच भातकुलीचे उपविभागीय अधिकारी यांनी वलगाव पोलीस ठाण्याला भेट दिली आहे. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस ठाण्यात झालेल्या या आत्महत्येचा तपास सीआयडी पथक करत आहे. विशेष म्हणजे अमरावती शहर आयुक्तालयात यापूर्वीही एका आरोपीने अशाप्रकारे आत्महत्या केली होती. 34 दिवसानंतर पुन्हा एकदा घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.