प्रतिनिधी, अविनाश कानडजे, औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांनी नेहमी चर्चेत असतात. पण यावेळी मात्र एका वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी चक्क कार्यकर्त्याची रिक्षा चालवली आहे. याचा व्हिडीओ एका कार्यकर्त्याने काढला आणि तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. एका कार्यकर्त्याने नवीन रिक्षा घेतली. या कार्यकर्त्याने जलील यांना याबाबत सांगितलं. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी चालवली स्वत: चालकाच्या सीटवर बसून रिक्षा चालवली. जलील आता मुख्यमंत्री होणार अशा कमेंट युजर्स करत आहेत. या व्हिडीओने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
साताऱ्यात जिप्सी रायडिंग आणि गाण्यावर ठेका….उदयनराजेंचा नवा VIDEO VIRAL खासदार उदयनराजे भोसले देखील आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. उदयनराजेंच्या डायलॉग असो किंवा पेहराव किंवा त्यांनी केलेली एखादी स्टाईल त्याची चर्चा होते. आता इम्तियाज जलील देखील चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांचा रिक्षा चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दुसरीकडे काही युजर्सनी रिक्षा चालक मुख्यमंत्री झाला तर आता जलीलही मुख्यमंत्री होणार अशा कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.