JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra MP Meet Narendra Modi : मोदींसोबतच्या बैठकीत महाराष्ट्राच्या खासदारांच मौन, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही

Maharashtra MP Meet Narendra Modi : मोदींसोबतच्या बैठकीत महाराष्ट्राच्या खासदारांच मौन, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समवेत आज खासदारांची बैठक संपन्न झाली. यामध्ये विविध राज्यातील सर्वच भाजप खासदार उपस्थित होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समवेत आज खासदारांची बैठक संपन्न झाली. यामध्ये विविध राज्यातील सर्वच भाजप खासदार उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्रातील भाजपचे 26 खासदार उपस्थित होते. दरम्यान पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत खासदारांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल कोणतीही चर्चा केली नसल्याची माहिती समोर आली आहे. आज महाराष्ट्र,कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील खासदारांची बैठक पार पडली.

यामध्ये शिवरायांच्या अपमानाविषयी आणि महाराष्ट्र -कर्नाटक सीमाभागाविषयी चर्चा होणे अपेक्षित होते परंतु चर्चा झाली नसल्याने याबाबत महाराष्ट्राच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींसमोर का मौन पाळलं यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर, राज्यसभा खासदार आणि मंत्री पियुष गोयल, राज्यसभा खासदार अनिल बोंडे उपस्थित होते.

हे ही वाचा : :  पेट्रोल पंप धारकही निघाले कर्नाटकात, काय आहेत कारणं? Video

संबंधित बातम्या

या बैठकीत महाराष्ट्रातील खासदारांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या भगतसिंह केश्यारी यांना हटवण्याची कोणतीही मागणी या खासदारांनी केली नाही.

यावर उदयनराजे म्हणतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला होता. त्यामुळे त्यांना हटवण्यासाठी 23 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं. शिवाजी महाराजांचा राज्यपालांनी अवमान केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र असून राज्यात ठिकठिकाणी निदर्शने होत आहे, असं त्या पत्रात नमूद केलं होतं, अशी माहिती उदयनराजे यांनी दिली.

जाहिरात

हे ही वाचा :  कोल्हापुरात कलम 144 लागू, रॅली काढल्यास कारवाई, ग्रामपंचायत निवडणुकांवर परिणाम

त्यानंतर राष्ट्रपतींनी ते पत्रं केंद्रीय गृहखात्याला पाठवलं. हा प्रक्रियेचा भाग आहे. आम्हीही प्रक्रियेचा भाग म्हणून मोदींच्या कार्यालयात आज पुन्हा पत्रं दिलं आहे. पंतप्रधानांचं शेड्यूल व्यस्त असल्याने त्यांच्याशी या विषयावर बोलणं झालं नाही. पण त्यांच्या कार्यालयात पत्रं देऊन आम्ही आमच्या भावना कळवल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या