JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबई क्रिकेटमध्ये फडणवीस-पवार सामना, सिल्व्हर ओकवर निघालेले शेलार अचानक माघारी

मुंबई क्रिकेटमध्ये फडणवीस-पवार सामना, सिल्व्हर ओकवर निघालेले शेलार अचानक माघारी

एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनची (MCA Election) निवडणूक 28 सप्टेंबरला होणार आहे. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार (Devendra Fadnavis vs Sharad Pawar) यांच्यात क्रिकेटच्या मैदानातला सामना पाहायला मिळणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 सप्टेंबर : एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनची (MCA Election) निवडणूक 28 सप्टेंबरला होणार आहे. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार (Devendra Fadnavis vs Sharad Pawar) यांच्यात क्रिकेटच्या मैदानातला सामना पाहायला मिळणार आहे. एमसीए निवडणुकीच्या आधी मुंबईमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एमसीए निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ही बैठक होणार होती, पण आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी या बैठकीला दांडी मारली आहे. आशिष शेलार बैठकीसाठी सिल्व्हर ओकपर्यंत आले पण तिथूनच ते माघारी फिरले. माध्यमांचे कॅमेरे बघताच आशिष शेलार यांनी सिल्व्हर ओकवर जाणं टाळलं. आशिष शेलार हे 2017-18 साली एमसीएचे अध्यक्ष होते, तर शरद पवारही दोनवेळा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहिले. डॉक्टर विजय पाटील हे सध्या एमसीएचे अध्यक्ष आहेत. एमसीएमध्ये पवार-फडणवीस सामना राजकारणातल्या मैदानानंतर आता क्रिकेटच्या मैदानातही फडणवीस-पवार यांच्यात रंगतदार लढत होणार आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी एमसीए निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संदीप पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक आहे. त्यांचा पूर्ण पाठिंबा देखील संदीप पाटील यांना आहे असं टाइम्सने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. तर अमोल काळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याचाही टाइम्सने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. अमोल काळे हे सध्या एमसीएचे उपाध्यक्ष आहेत. संदीप पाटील यांना मागच्यावेळीही एमसीएची निवडणूक लढवायची होती, पण काही अटी आणि अडचणींमुळे त्यांना ही निवडणूक लढवता आली नाही. यंदा एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 5 उमेदवार आहेत. संदीप पाटील, विजय पाटील,अमोल काळे, मिलिंद नार्वेकर आणि नवीन शेट्टी हे अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असले, तरी खरी चुरस मात्र संदीप पाटील आणि अमोल काळे यांच्यात असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या