JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / MBBS Student Crime News : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीने रुग्णालयातच उचललं टोकाचं पाऊल, यवतमाळमधील घटनेने खळबळ

MBBS Student Crime News : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीने रुग्णालयातच उचललं टोकाचं पाऊल, यवतमाळमधील घटनेने खळबळ

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

यवतमाळ, 13  जानेवारी : यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थीनीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. वसतीगृहातील खोलीमध्ये तिने गळफास लावला. ही घटना लक्षात येतात तिला खाली उतरून रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.

तिच्यावर सद्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती धोक्याबाहेर असून या घटनेबाबत रुग्णालयात कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. याबाबत अधिकृतपणे माहिती देण्यास रुग्णालय प्रशासन तयार नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान त्या विद्यार्थीनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यामागील कारण अजूनही पुढे आले नसून परीक्षेच्या टेन्शनमुळे हा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा :  कंझावाला प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींबाबत गृहमंत्रालयाकडून महत्त्वाचे निर्देश, पोलिसांवरही कारवाईच्या सूचना

संबंधित बातम्या

याबाबत यवतमाळ शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. मागच्या आठवड्यात 5 जानेवारीला शिकाऊ डॉक्टरवर चाकू हल्ला झाला होता. त्यामुळे पुन्हा एक शिकाऊ डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान या  दोन्ही प्रकरणांमुळे वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय पुन्हा जोरदार चर्चेत आले आहे.

कल्याणी शिवणकर (वय 22) असे या विद्यार्थीनीचे नाव असून ती मूळची नागपूर  येथील आहे. आज, सायंकाळच्या सुमारास वसतिगृहातील खोलीमध्ये तिने गळफास लावला. ही घटना लक्षात येताच तिला खाली उतरवून रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती धोक्याबाहेर असून या घटनेबाबत रुग्णालयात कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे.  

जाहिरात

आरटीओच्या कारवाई विरोधात वाहनचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरात एका वाहन चालकाने आरटीओला वैतागून अंगावर डिझेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मारुती चिकलेकर असे या वाहनचालकाचे नाव असून आरटीओच्या अधिकाऱ्याच्या समक्षच त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतले.  

हे ही वाचा :  साई भक्तांवर काळाचा घाला; बस, ट्रकच्या भीषण अपघातात 10 ठार

जाहिरात

वारंवार वाहनांची होणारी तपासणी आणि त्यानंतर करण्यात येणाऱ्या दंडामुळे हा वाहनचालक त्रस्त झाला होता. त्याने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिकांनी त्याला अडवलं त्यामुळे अनर्थ टळला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या