JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शहीद जवानांच्या वीरपत्नीने दिला आत्मदहनाचा इशारा, जमिनीसाठी ससेहोलपट

शहीद जवानांच्या वीरपत्नीने दिला आत्मदहनाचा इशारा, जमिनीसाठी ससेहोलपट

आज या उद्या या असे सांगत वर्षभरापासून भाग्यश्री राख या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चकरा मारत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड,7 जानेवारीः महसूल प्रशासनाच्या लाल फितीतील कारभाराला कंटाळून शहीद जवानाच्या वीरपत्नीने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. शासन निर्णयानुसार शहिदांच्या वारसा दोन हेक्टर जमीन देण्यात यावी, असा निर्णय असतानाही बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे 15 शहिदांच्या कुटुंबाला अद्याप लाभच मिळाला नाही. पाटोदा तालुक्यातील भाग्यश्री तुकाराम राख या शहिदांच्या पत्नीने परिश्रम घेत कागदपत्रे गोळा केले. फाईल जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. मात्र, गेल्या एक वर्षापासून त्यांच्या फाईलवर कोणतीही कार्यवाही झाली नाही. आज या उद्या या असे सांगत वर्षभरापासून भाग्यश्री राख या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चकरा मारत आहे. अनेकदा अर्ज, विनंत्या करून देखील जमीन मिळत नसल्याने नाईलाजास्तव भाग्यश्री यांनी अखेर प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला आहे. काय आहे प्रकरण? पाटोदा तालुक्यातील थेरला येथील जवान तुकाराम राख यांना 1 मे 2010 रोजी ऑपरेशन रक्षकमध्ये वीरमरण आले होते. भाग्यश्री या एकट्याने संघर्ष करत कुटुंब चालवत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या 28 जून 2018 च्या शासन निर्णयान्वये शहिदांच्या वारसाना शासनाकडून 2 हेक्टर जमीन देण्यात यावी, असा निर्णय आहे. मात्र अधिकारी कुठे कोणतेही सहकार्य करत नाहीत. उडवा उडवीची उत्तरे देतात. माझी फाईल पूर्ण असताना देखील वर्षभरापासून त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. एकटीने किती वेळा चकरा माराव्या, असा संताप सवाल भाग्यश्री यांनी उपस्थित केला आहे. तसेच या बाबतीत सामजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना देखील निवेदन दिले. पण अद्याप काहीच हालचाल झाली नाही, अशी खंत बोलून दाखवली. रोज कार्यालय उघडण्याच्या वेळी येणाऱ्या भाग्यश्री अनेक दिवसापासून चकरा मारत आहेत. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात अशीच अवस्था 15शहिदांच्या वारसांची आहे.शहिदांच्या पत्नी बाबतीत तरी कर्मचारी अधिकाऱ्यांनी सहानुभूती दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही जमीन अध्यापन त्यांना मिळाली नाही देशाची सेवा करत असताना पती शहीद झाल्यानंतर एकट्याने संघर्ष करणाऱ्या भाग्यश्री राख यांनी कागदपत्रांची फाईल तयार केली. गेल्या एक वर्षापासून फाईल धूळखात पडून आहे. याकडे लक्ष देण्यासाठी कुठल्याही अधिकाऱ्याला व राज्यकर्ताला वेळ नाही. अखेर वैतागून भाग्यश्री यांनी आता महसूल प्रशासनाविरोधात आत्मदहचा इशारा दिला आहे. यामुळे निगरगट्ट प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या