पुण्याचा रिकव्हरी रेटही देशात सर्वात जास्त आहे. त्यामुळे हॉटस्पॉट झालेल्या पुण्यात आता कोरोनाचा आलेख उतरणीला लागला असून तो कायम ठेवण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे.
औरंगाबाद 7 जुलै: औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. आज शहरातले शिवसेनेचे नगरसेवक नितीन साळवे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची झुंज संपली. ते बालाजी नगर वॉर्डातून निवडून आले होते. हे वृत्त टीव्ही 9 मराठीने दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असल्याने प्रशासनासमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे शहरात सोमवारी अनेक भागात निर्बंध लागू करण्याचा घेण्यात आला आहे. औरंगाबाद महानगर पालिकेचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना शहरात कडक संचारबंदी लागू करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे. राज्यात औरंगाबाद हाही मोठा हॉटस्पॉट झाला आहे. रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने आरोग्यसेवेवर प्रचंड ताण येत आहे. पुणे जिल्ह्यातील भाजप आमदार कोरोना पॉझिटिव्ह; सोशल मीडियावरुन दिली माहिती दरम्यान, कोरोनाबाधितांच्या संख्येत आता मुंबईने चीनलाही मागे टाकल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या 85 हजार 320 इतकी आहे, तर मुंबईत ही संख्या आता 85 हजार 724 वर पोहोचली आहे. तर चीनमध्ये 4 हजार 648 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला असून मुंबईमध्ये ही संख्या 4938 इतकी आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; कोविडमधून बरा झालेल्या रुग्णाच्या स्वागताला मोठी गर्दी काही दिवसांपूर्वी चीनने कोरोनामुक्त होण्याचा दावा केला होता. चीनमध्ये आता अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. चीनमध्ये केवळ 500 ते 600 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र त्याचवेळी मुंबईत मात्र 23 हजार 624 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.