JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / विनायक मेटेंनंतर शिवसंग्रामचा आमदार कोण? संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना सुचवले नाव, केली मोठी मागणी

विनायक मेटेंनंतर शिवसंग्रामचा आमदार कोण? संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना सुचवले नाव, केली मोठी मागणी

’ मराठा समाजासाठी संपूर्ण आयुष्य काम करणाऱ्या नेत्याच्या कुटुंबाला आणि संघटनेला बळ मिळालं पाहिजे'

जाहिरात

' मराठा समाजासाठी संपूर्ण आयुष्य काम करणाऱ्या नेत्याच्या कुटुंबाला आणि संघटनेला बळ मिळालं पाहिजे'

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 21 ऑगस्ट : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे (vinayak mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर शिवसंग्राम संघटनेचं काय होणार असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. तर, विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे (dr joyti mete) यांना आमदार करावे, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje) यांनी केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आज शिवसंग्राम संघटनेचे नेते स्वर्गीय विनायक मेटे यांच्या बीड येथील निवासस्थानी भेट घेऊन मेटे कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी मराठा समाज आणि शिवसंग्राम पक्ष आणि संघटनेला टिकवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्योती मेटे यांना आमदारकी द्यावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली. मराठा समाजासाठी संपूर्ण आयुष्य काम करणाऱ्या नेत्याच्या कुटुंबाला आणि संघटनेला बळ मिळालं पाहिजे तसंच राजकीय पाठबळ मिळाल्यास महाराष्ट्रातल्या तमाम गरीब मराठ्यांना न्याय मिळेल. त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसंग्रामचे अध्यक्ष स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना राज्यपाल नियुक्त किंवा इतर कुठेही आमदारकी द्यावी, अशी माझी मागणी आहे, असं संभाजीराजे म्हणाले. (मेळघाटात आदिवासी महिला आक्रमक, अजित पवारांचा अडवला ताफा, विचारला जाब) दरम्यान, विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर काही प्रश्न उपस्थितीत झाले. विनायक मेटे यांचा अपघात झाला की घातपात आहे, याबद्दल तपास सुरू आहे. 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी विनायक मेटे हे रवाना झाले होते. मुंबईला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. गाडीमध्ये त्यावेळी तीन व्यक्ती होते. जखमी व्यक्तींना तातडीने पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान विनायक मेटे यांचं निधन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटे अपघात प्रकरणाचा तपास हा सीआयडीकडे सोपवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या