मुंबई, 08 मे : सेंद्रिय शेतीची (organic farming) वाटचाल आश्वासक असून देशात सेंद्रिय उत्पादनात राज्याचा दुसरा क्रमांक आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. परंपरागत शेती सोबतच कृषी विभागातर्फे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रमाणिकरणासाठी अनेक विभागांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे कृषी मंत्री दादा भुसे (farmer minister dada bhuse) यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार (sharad pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, सेंद्रिय शेतीसाठीचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्यात येईल. अन्न प्रकिया व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. शेतमालाला चांगला भाव मिळावा त्याच बरोबर इतर अपारंपरिक भाजीपाल्याची ग्राहकांना ओळख व्हावी, यासाठी आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचेही भुसे यांनी सांगितले. (organic farming)
हे ही वाचा : Golden Chance! मध्य रेल्वे मुंबई इथे 75,000 रुपये पगाराची नोकरी; संधी सोडू नका; करा अर्जगृहनिर्माण संस्थांमधून सेंद्रिय उत्पादनासंबधी जनजागृती करणार - सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
सेंद्रिय उत्पादनाला योग्य ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार व पणन विभागातर्फे गृहनिर्माण संस्थांमधून जनजागृती करुन उत्पादनाविषयी माहिती दिली जाईल, असे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. याशिवाय पणन विभागाने सुरु केलेल्या ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्मसवर या उत्पादनांना विक्रीसाठी ठेवता येईल. त्याचबरोबर विक्री मेळावे, प्रदर्शन आणि इतर उपक्रमांतून सेंद्रिय उत्पादनांबाबत प्रबोधन करता येईल असेही पाटील म्हणाले.
पशुंच्या उत्तम वाढीसाठी सेंद्रिय चारा उपयुक्त - पशु संवर्धन व दुग्धव्यवसायमंत्री सुनील केदार
राज्यातील शेतकऱ्यांना दुधाचे उत्तम उत्पादन मिळावे यासाठी पशुंना सेंद्रिय चारा दिल्यास उपयुक्त ठरेल यासाठीचा प्रस्ताव विभागामार्फत तयार करण्याची तयारी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री सुनील केदार यांनी दाखवली आहे. यासाठी मोर्फाच्या सदस्यांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. कोरोना नंतर प्रथिनयुक्त आहारांचे महत्त्व लोकांना पटल्यामुळे दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे तसेच याविषयावर जनजागृती होत आहे, असे केदार यांनी सांगितले.
सेंद्रिय व विषमुक्त शेती या विषयावर अन्न व औषध प्रशासन, सहकार पणन, पशु संवर्धन व दुग्ध विकास, तसेच कृषी विभागाची संयुक्त बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत सेंद्रिय शेती धोरण, सेंद्रिय शेतमालाची विपणन व्यवस्था व इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.