JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कांद्याला जीवनावश्यक वस्तूत टाकणारा महामुर्ख कोण? राज्यमंत्र्यांचा मोदी सरकारवर घणाघात

कांद्याला जीवनावश्यक वस्तूत टाकणारा महामुर्ख कोण? राज्यमंत्र्यांचा मोदी सरकारवर घणाघात

कांदा खाल्ल्या नाही तर लोक मरतात, असा एखादा सुज्ञ मला दाखवा. बच्चू कडू त्याचा गुलाम राहील.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 17 मे: शेतमालाला योग्य किंमत मिळावी, यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. त्यानुसार कडधान्ये, खाद्यतेले, तेलबिया, डाळी, कांदा आणि बटाटा ही पिके निर्बंधमुक्त करण्यात येणार आहेत. कांदा जीवनावश्यक वस्तूंमधून काढणार, असं मोदी सरकारचं धोरण येणार आहे. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. हेही वाचा.. मुलीकडे अचानक मोबाइल आला कसा? वडिलांनी जाब विचारताच जेवणात कालवलं विष! ‘कांदा जीवनावश्यक वस्तूत टाकणारा महामुर्ख कोण आहे, त्याला शोधलं पाहिजे. कांदा खाल्ल्या नाही तर लोक मरतात, असा एखादा सुज्ञ मला दाखवा. बच्चू कडू त्याचा गुलाम राहील. ही हरामी खरं तर संपली पाहिजे. कांदा निर्यातीला सबसिडी दिली पाहिजे,’ असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. दरम्यान, शेतमालाला योग्य किंमत मिळावी, यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, याबाबत बच्चू कडू यांनी सरकारचे अभिनंदनही केले, आभारही मानले आहे. बच्चू कडू यांनी सांगितलं की, पेरणी करताना शेतीमालाला दर काय असेल आणि किती माल विकला जाईल याची शेतकऱ्याला खात्री नसते. ही जोखीम कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाची हमी देणारी कायदेशीर यंत्रणा तयार करणार. यात उत्पादनाच्या गुणवत्तेचे देखील मानकीकरण केले जाईल. हेही वाचा..  मुंबईतून परप्रांतीय मजूर गेल्यामुळे मराठी तरुणांना संधी? राऊतांचं रोखठोक’ उत्तर शेतकऱ्यांना दलालांवर अवलंबून न राहता थेट निर्यातक, घाऊक व्यापारी, प्रक्रिया उद्योगांना माल शेतातूनच विक्री करता येईल. तरच शेतकरी या पिकांची निर्यातही करू शकणार आहे. त्यामुळे त्याच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होण्याची संधी असून त्याचे उत्पन्न वाढण्याची आशा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या