नागपूर, 02 सप्टेंबर: गेल्या दीड वर्षांपासून देशभरात कोरोनानं (Corona Virus) अक्षरशः थैमान घातलं आहे. या महामारीमुळे लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे शाळा, कॉलेजेस (Schools and Colleges reopen) गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण दिलं जातं आहे. मात्र आता हळूहळू सर्व निर्बंध शिथिल (Corona Unlock) होऊ लागले आहेत. दुकानं आणि मॉल्सही सुरु करण्यात आले आहेत. मात्र शाळा कधीपासून सुरु होणार (When Schools Reopen in Maharashtra) हा प्रश्न शाळांना, शिक्षकांना आणि पालकांना पडला आहे. यावर आज राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माहिती दिली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे. शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. मात्र इतर राज्यांमध्ये कोरोना प्रभाव पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. शाळा करण्याबाबत वुइचार करताना आधी राज्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेतली जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले. तसंच कोरोना टास्क फोर्सच्या सूचनांकडेही लक्ष देऊन त्यानुसार SOP मध्ये बदल केले जातील असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. मात्र शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय योग्य ठरेल का खरा प्रश्न आहे. हे वाचा - BARC Recruitment: भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई इथे नोकरीची संधी; लगेच करा अर्ज विद्यार्थ्यांना अजूनही लस नाही शाळा सुरु कारण्यासासंदर्भातील सरकारचा निर्णय विचारपूर्वक घेतलेला असावा कारण शाळेतील विद्यार्थी हे 18 वर्षांखालील असणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांना अजूनही कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) देण्यात आली नाहीये. संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुद्दा लक्षात घेता आता शाळा सुरु करणं धोक्याचं ठरू शकतं असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र सरकार यावर काय निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं असेल.