मुंबई, 22 जून : राज्यातील राजकारणात भूकंप झालेला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) संध्याकाळी 5 वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री यावेळी त्यांचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडीवर मुख्यंमंत्री त्यांची बाजू मांडणार असून ते या लाईव्हमध्ये रजीनामा देणार की एकनाथ शिंदे यांना आव्हान देणार हे थोड्य़ाच वेळात स्पष्ट होईल. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार अल्पमतामध्ये आल्याचं स्पष्ट झालंय. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभा उपाध्य़क्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहलंय. या पत्रामध्ये 34 आमदारांच्या सह्या आहेत. शिवसेनेच्या 55 पैकी 34 आमदारांच्या या पत्रावर सह्या असल्यानं बहुसंख्य आमदार हे शिंदे यांच्यासोबत आहेत, त्यामुळे ठाकरे सरकार आता अल्पमतामध्ये आलं आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा आता बरखास्तीकडे चालली आहे, असं सूचक ट्वीट केलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकाराचा संसार अखेरीस अडीच वर्षात आटोपला आहे, असं मानलं जात आहे.महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, असं म्हणत संजय राऊत यांनी ठाकरे सरकारच्या अस्ताचे संकेत दिले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये घडत असलेल्या या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री त्यांची बाजू या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडणार असून त्यांच्या लाईव्हकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.