Ashok Chavan meet Devendra Fadnavis
मुंबई, 2 सप्टेंबर : गणेशोत्सवात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीची चर्चा असताना आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आधीच केंद्रातील काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे अनेकांचे राजीनामे पडले आहेत. तर महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये देखील फूट पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे माजी दोन नेते लवकरच शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणार असल्याची चर्चाही रंगली आहे. हेही वाचा-मोठी बातमी! काँग्रेसला पुन्हा झटका, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे माजी मंत्री घेणार शपथ? मिळालेल्या माहितीनुसार आशीष कुलकर्णी यांच्या घरी फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची भेट झाली. त्यांच्यासोबत तीन नेते आणि 9 आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये उभी फूट पडू शकते. या भेटीमागचं निमित्त गणपतीचं असलं तरी या दरम्यान काय चर्चा झाली असावी यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. हेही वाचा-‘मनाची तयारी आहे का’? राहुल गांधींचा नाना पटोलेंना फोन, काय चर्चा झाली? अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशीची चर्चा होत आहे. तर शिंदे गट मनसेसोबत युती करणार का अशीही एक चर्चा सुरू आहे. चव्हाण-फडणवीस भेटीने राजकीय चर्चा जोरात सुरू झाली आहे.