JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / MLC Election UPDATES : नवा ट्विस्ट! मलिक-देशमुखांची मतदानासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

MLC Election UPDATES : नवा ट्विस्ट! मलिक-देशमुखांची मतदानासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

राष्ट्रवादीच्या (NCP) या दोन्ही नेत्यांच्या विरोधात ईडीची चौकशी सुरू असून ते सध्या जेलमध्ये बंद आहेत. मतदान करण्याची परवानगी देणारी त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जून : विधान परिषद निवडणुकीच्या 10 जागांसाठी (MLC Election result) मतदानाला सुरुवात झाली आहे. सत्ताररूढ महाविकास आघाडी आणि विरोधातील भारतीय जनता पक्ष या दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे प्रत्येक आमदाराचे मत निर्णायक ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) आजारी आमदार देखील यावेळी मतदान करणार आहेत. तर दुसरिकडं एनसीपी नेते नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मतदान करता येणार नाही.सर्वोच्च न्यायालयात याचिका असल्याने मतदानास दोन्ही नेते मुकणार आहे.सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांच्या विरोधात ईडीची चौकशी सुरू असून ते सध्या जेलमध्ये बंद आहेत. मतदान करण्याची परवानगी देणारी त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्या याचिकेला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यापूर्वी 11 जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत देखील त्यांना मतदान करता आले नव्हते.

संबंधित बातम्या

राष्ट्रवादीमधील नाराजी उघड विधान परिषदेच्या मतदानासाठी सगळे आमदार मुंबईत हजर आहे. पण, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील मुंबईत दाखल न झाल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. पण, खुद्द दिलीप मोहिते पाटील यांनी आपण नाराज असल्याचे सांगितलं आहे. MLC Election UPDATES : मतदान करणारच! भाजप आमदार रुग्णवाहिकेतून मुंबईकडे रवाना, VIDEO मी अजूनही नाराज आहे. आम्ही सांगितलेली कामं बोलुनही होतं नाही, असं म्हणत  खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी नाराजीला वाट मोकळी करून देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या