JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्रात पुन्हा Lockdown लागणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं...

महाराष्ट्रात पुन्हा Lockdown लागणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं...

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता विषाणूचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवली आहे.

जाहिरात

आरोग्य विभागाच्या गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे, अ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 सप्टेंबर : राज्यात कोरोना (Corona) बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी दोका अद्याप टळलेला नाहीये. अनेक भागांत अद्यापही रुग्णसंख्या कायम असल्याचं दिसत आहे आणि त्यातच कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाट (Coronavirus third wave) येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या महिन्यात गौरी-गणपती आहेत आणि सणासुदीच्या काळात कोविड रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत असल्याने पुन्हा कठोर निर्बंध (Restrictions) किंवा लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, सध्या लॉकडाऊनचा कुठलाच विषय नाहीये. मात्र ज्यादिवशी 7 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडेल त्यादिवशी लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावावे लागतील, असं नोटिफिकेशनमध्ये आम्ही अगोदरच स्पष्ट केलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या या माहितीमुळे हे स्पष्ट झालं आहे की, सणासुदीच्या या काळात राज्यात तुर्तासतरी कोणतेही कठोर निर्बंध किंवा लॉकडाऊन लावण्यात येणार नाहीये. लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने केली मुलीच्या काकांची हत्या उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत अशा सूचना देण्यात आल्या असून तसा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दरम्यान आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल असेही अजित पवार म्हणाले. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत. मात्र केंद्राकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पध्दतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या मात्र काही दिवसातच विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले होते. शिवाय तिसर्‍या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे त्यामुळे केंद्रसरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या