JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भविष्य पाहण्यासाठी ज्योतिषाकडे? अंनिसकडून टीकास्त्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भविष्य पाहण्यासाठी ज्योतिषाकडे? अंनिसकडून टीकास्त्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज शिर्डी दौऱ्यावर आले होते. शिर्डी दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री मिरगाव (सिन्नर) मध्ये ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेले होते का? असा प्रश्न उपस्थित आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 नोव्हेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज शिर्डी दौऱ्यावर आले होते. शिर्डी दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री मिरगाव (सिन्नर) मध्ये ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेले होते का? असा प्रश्न उपस्थित आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री आज शिर्डी दौऱ्यावर असताना मिरगाव सिन्नरमधील एका ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेल्याचं समजत आहे. हे खरं असल्यास ही अत्यंत बेजबाबदार कृती आहे. पुरोगामी महाराष्ट्रात संविधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध महाराष्ट्र अंनिस करते,’ असं महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे म्हणाले आहेत. ‘ज्योतिष हे शास्त्र नसून थोतांड आहे. कुणी ते शास्त्र असल्याचं सिद्ध केलं तर आम्ही 21 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्तनातून चुकीचा संदेश गेला आहे,’ असा आरोप अनिंसने केला आहे. ‘थोतांड विषयाकडे संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने वळावं हे पूर्णपणे निषेधार्ह आहे. महाराष्ट्र अंनिस याचा निषेध करते,’ असं महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव डॉ.टी.आर.गोराणे म्हणाले. मुख्यमंत्री साईंच्या चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांनी सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. साईबाबांच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या