JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra 10th result 2021 Declared: काय आहेत या ऐतिहासिक निकालाची वैशिष्ट्य; जाणून घ्या

Maharashtra 10th result 2021 Declared: काय आहेत या ऐतिहासिक निकालाची वैशिष्ट्य; जाणून घ्या

नेमके कोणत्या विभागाचे किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत याबाबदल माहिती जाऊन घेऊया.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जुलै: हावीचा निकाल जाहीर (Maharashtra 10th result) झाला आहे. कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेच्या (Second Wave) प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षा (Maharashtra 10th result) होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. आता या ऐतिहासिक निकालाची वैशिष्ट्य काय आहेत. नेमके कोणत्या विभागाचे किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत याबाबदल माहिती जाऊन घेऊया. ऐतिहासिक निकालाची वैशिष्ट्य या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,75,806 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,75,752 विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी 15,74,994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 99.95 आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (100%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (99.84 %) आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 99.96% असून विद्यार्थ्यांचा निकाल 99.94 % आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 0.02% ने जास्त आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 % लागला आहे. हे वाचा - दहावीच्या विद्यार्थ्यांनो, अजूनही रोल नंबर माहिती नाही? ‘या’ लिंकवर करा क्लिक एकूण ७२ विषयांना सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीत निश्‍चित केलेल्या भारांशनुसार गुणदान करण्यात आले असून त्यामध्ये 27 विषयांचा निकाल 100% टक्के लागला आहे. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 64,86,83 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 698885 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 218070 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, 9356 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील 22767 शाळांतून 1658614 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 22384 शाळांचा निकाल 100 % लागला आहे. सन २०२१ चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च २०२० च्या निकालाच्या तुलनेत 4.65% जास्त आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 28424 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 97.45 आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या