पण 2014 साली पक्षाने दौंड मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट न दिल्याने त्यांनी महादेव जानकर यांच्या रासपमध्ये प्रवेश केला.
मुंबई, 13 जानेवारी : ‘तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखो करतो, अशी शिवसेना आणि भाजपची सध्या रणनीती आहे,’ असा दावा पशुसंवर्धन आणि दुग्ध व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी केला आहे. हे दोनीही पक्ष आगामी निवडणुकीत युती करणार आहेत, असा गौप्यस्फोटही जानकर यांनी केला आहे. ‘आता कितीही भांडत असले तरी निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार आहे. पण नाहीच झाली तर त्या दोघांमध्ये युती होण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेईल,’ असंही महादेव जानकर म्हणाले. ‘येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्राबाहेर स्वतंत्र लढणार आहे, तर महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीसोबत सामील होणार आहे,’ असं म्हणत आगामी निवडणुकीबाबत महादेव जानकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, मुंबईत झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मात्र भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आला नाही. लाटेचीही आम्ही वाट लावू,’ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समितीच्या अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरेंनी सरकारवर चौफेर टीका केली. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मोठे मुद्दे: -गेल्या आठवड्यात कर्जमाफीसाठी एक शेतकरी आला आणि शिवसेनेच्या दणक्यानंतर पाच तासांत त्याची कर्जमाफी झाली -युती झाली तर कुणाच्य़ा जागा वाढतील, मतदानाची टक्केवारी वाढेल यात मला रस नाही -देश किती पुढे जाईल यात रस आहे -आम्हाला लेचे-पेचे समजू नका -ठाकरे सिनेमातून शिवसेना कशी उभी राहिली हे दाखवलं आहे -मराठी माणसाला त्याच्या मनगटातील ताकदेची जाणीव शिवसनेनं करून दिली. काय म्हणाले होते अमित शहा? ‘राज्यात युती झाली तर ठीक, नाहीतर विरोधियोंको ‘पटक’ देंगे असा इशारा अमित शहा यांनी दिला होता. लातूर इथं पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शहांचा हा इशारा शिवसेनेलाच असल्याची चर्चा सुरू झाली. आता शिवसेनेकडून त्याला जोरदार उत्तर दिलं जात आहे. VIDEO : एक आंबेडकर दोन भूमिका…राष्ट्रवादीवर टीका तरीही आघाडीचा पर्याय खुला