JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गरोदर महिला वाट तुडवत घराकडे निघाली, वाटेतच झाली प्रसूती आणि...

गरोदर महिला वाट तुडवत घराकडे निघाली, वाटेतच झाली प्रसूती आणि...

यवतमाळला पायी जात असलेल्या महिलेची अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात रस्त्यातच प्रसूती झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 20 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक गोर-गरीब मजुरांचे हाल होत आहेत. अशातच पुण्यातून यवतमाळला पायी जात असलेल्या महिलेची अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात रस्त्यातच प्रसूती झाली आहे. सुदैवाने वेळीच मदत मिळाल्याने आई आणी मुलगी दोघीही सुखरूप आहेत. वाघोली पुणे येथे दोन वर्षापासून आदिवासी समाजातील संदीप विठ्ठल काळे आणी पत्नी निर्मला रोजंदारीचे काम करत होते, लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही आणी घरात खायला अन्न नाही. त्यातच निर्मला पोटाशी अशा बिकट परिस्थितीत करायचं काय असा प्रश्न त्यांना पडला होता. शेवटी त्यांनी पायी चालत आपल्या गावचा रस्ता धरला. नगर-औरंगाबाद रस्त्याने पायी चालत असताना निर्मलाला नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा गावाजवळ प्रसूतीवेदना सुरू झाल्या. गावचे उपसरपंच राहुल मोटे आणी आधार प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जयवंत मोटे यांना माहिती मिळताच ते मदतीला धावून आले. त्यांनी या महिलेस जवळ असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या इमारतीमध्ये आसरा दिला. तेथे आरोग्य उपकेंद्राच्या परिचारिका सोनाली न्यालपेल्ली आणि वनीता काळेने यांनी या निर्मलाची प्रसूती केली. महिलेस सुंदर कन्यारत्न झाले असून मायलेकी सुखरुप आहेत. हेही वाचा- डॉक्टर आणि पोलिसांनंतर पत्रकारही कोरोनाच्या विळख्यात, मुंबईत 53 जणांना लागण वेळीच यांना वैद्यकीय आणि मानसिक आधार मिळाल्याने निर्मलाची प्रसूती होवू शकली. गावाकडं पायी निघालेलं हे कुटुंब निर्मनुष्य असलेल्या परिसरात असतं तर काय स्थिती झाली असती याची कल्पना न केलेली बरी. बँकेच्या आवारातच निर्मलाने लक्ष्मीला जन्म दिला आहे. प्रसुतीनंतर त्यांना नेवासा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रशासन सर्व कुटूंबाची काळजी घेत आहे. दरम्यान, आजही अनेक गोरगरीब आपल्या घराकडे जाण्यासाठी उपाशी तपाशी पायपीट करताना दिसत आहेत. त्यांना ओढ लागलीय आपल्या घरी पोहचण्याची. अशा लोकांना घरी पोहचवण्यासाठी राज्यसरकारने पावलं उचलणे गरजेचे आहे, अशी मागणी आता समोर येऊ लागली आहे. संपादन- अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या