JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रत्नागिरीत पावसाचं रौद्ररूप; नदीवरील पूल गेला वाहून, पाहा LIVE VIDEO

रत्नागिरीत पावसाचं रौद्ररूप; नदीवरील पूल गेला वाहून, पाहा LIVE VIDEO

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरीत नदीवरुल एक पूल वाहून जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिवाजी गोरे, प्रतिनिधी रत्नागिरी, 23 जुलै: रत्नागिरीत (Ratnagiri) गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rainfall) नद्या, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून पाणी आसपासच्या परिसरात शिरले आहे. वस्त्यांमध्ये चक्क 10 ते 15 फूट पाणी आल्याचं पहायला मिळत आहे. याच दरम्यान आता रत्नागिरीतील एक जुना पूल वाहून जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. रत्नागिरीतील कासारकोळवन नदीवरील जुना पूल वाहून गेला आहे. नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात हा पूल वाहून गेला आहे. पूल वाहून जातानाची घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चक्क पूल वाहून गेल्यामुळे या वाहत्या पाण्याचा आणि पुराच्या पाण्याचा जोर किती भीषण होता याची कल्पना आपण करु शकतो. तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात पुन्हा भरले. पुराचे पाणी खेड- दापोली- मंडणगड महामार्ग बंद झाला आहे. नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! खेडमध्ये घरांवर डोंगर कोसळला; 17 जण ढिगाऱ्याखाली तर रायगडात दरड कोसळून चौघांचा मृत्यू एनडीआरएफच्या तुकड्या , स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक दलाचे जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासोबतच रत्नागिरीत आता नौदलाच्या तुकड्याही मदत आणि बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. Ratnagiri Flood: चिपळूणमधील पुराची भीषणता दाखवणारे VIDEO आले समोर, दृश्य पाहून काळजाचा ठोका चुकेल रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर असून सध्या ती 8 मीटर वरून वाहते आहे. वशिष्टी नदीची धोका पातळी 7 मीटर असून ती 7.8 मीटर वरून वाहते आहे. काजळी नदी धोका पातळीच्या 1.74 मीटर वरून वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरे व परिसरातील गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलविणे, स्थलांतर करणे व इतर मदत कार्य जोरात सुरु केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या