JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धक्कादायक! आरे कॉलनीत महिलेवर बिबट्याचा हल्ला, महिनाभरातील दुसरी घटना

धक्कादायक! आरे कॉलनीत महिलेवर बिबट्याचा हल्ला, महिनाभरातील दुसरी घटना

आरे कॉलनीत बिबट्याची दहशत कायम आहे. आरे कॉलनी परिसरामध्ये पुन्हा बिबट्याने एका महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई :  आरे कॉलनीत बिबट्याची दहशत कायम आहे.  आरे कॉलनी परिसरामध्ये पुन्हा बिबट्याने एका महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. संगिता गुरव असे या महिलेचे नाव आहे. त्या काल संध्याकाळी आपल्या घरी जात होत्या. त्याचवेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये संगिता गुरव या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर  ट्रामा केअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दिवाळीच्या दिवशी आरे कॉलनी 15 नंबर युनिटमध्ये बिबट्याने एक दीड वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा बिबट्याने महिलेवर हल्ला केल्यानं स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. महिला गंभीर जखमी  घटनेबाबत अधिक माहिती अशी की, संगिता गुरव या शुक्रवारी रात्री आपल्या घरी जात होत्या. याचदरम्यान बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत संगिता गुरव या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर ट्रामा केअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महिनाभरात दुसरा हल्ला   आरे कॉलनी परिसरामध्ये आठ ते दहा बिबट्याचा वावर असल्याची माहिती आहे. त्यामुळे बिबट्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये देखील वाढ होत आहे.  महिनाभरातील हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी दिवाळीच्या दिवशी आरे कॉलनी 15 नंबर युनिटमध्ये बिबट्याने एका दीड वर्षांच्या मुलीवर हल्ला कोला होता. या हल्ल्यामध्ये या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर बोरिवली वन विभागाचं पथक ॲक्शन मोडमध्ये दिसलं त्यांनी याभागातून दोन बिबट्यांना पिंजरा लावून जेरबंद केलं.

नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण   आरे कॉलनी परिसरामध्ये  आठ ते दहा बिबट्याचा वावर आहे. बिबट्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरातील हा दुसरा हल्ला आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या आदिवासी पाडे आणि वस्तीवरील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. वनविभागाने योग्य ती कारवाई तातडीने करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या