लालबागचा राजा
मुंबई, 29 ऑगस्ट : पावसाळा सुरू झाला की सण आणि उत्सवांची चाहूल लागते. त्यात महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे गणेशोत्सव. मात्र, मागची दोन वर्ष कोरोना निर्बंधामुळे मर्यादीत स्वरुपात गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव साजरा केला होता. आता कोरोना निर्बंध हटवल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. गणेशभक्तांचं आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा आज होणार आहे. लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन - यंदाच्या गणेशोत्सवाला 31 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. त्याआधी आज सोमवारी 29 ऑगस्टला लालबागचा राजाचे प्रथम दर्शन होणार आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून लालबागचा राजाचे प्रथम दर्शन (प्रिंट माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी फोटो सेशन) आज सायंकाळी सात वाजता होणार आहे. हा कार्यक्रम LALBAUGCHA RAJA या यूट्यूब चॅनेलवर भाविकांना लाईव्ह पाहता येणार आहे.
हेही वाचा - Modak Recipe : यंदाचा गणेशोत्सव या 5 प्रकारच्या मोदकांनी बनवा आणखी खास, पहा रेसिपी
दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या संसर्गामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने “आरोग्य उत्सव” साजरा करून आदर्श निर्माण केला होता. त्यानंतर गेल्यावर्षी यंदा गणेश भक्तांच्या विनंती वरून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचने नुसार गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांना घेता आलं.