JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जीवाची पर्वा न करता त्याने उतरला तिरंगा, आगीची झळ पोहचू नये म्हणून धावत चढला 10 मजले

जीवाची पर्वा न करता त्याने उतरला तिरंगा, आगीची झळ पोहचू नये म्हणून धावत चढला 10 मजले

जीएसटी भवन मध्ये काम करणाऱ्या कुणालने दाखवला जवानाचा जिगरा

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 फेब्रुवारी: अग्निशमन दल जीवाची बाजी लावून आग विझवण्याचं कार्य करतात. पण अशा कोणत्याही दलाचा भाग नसणाऱ्या कुणाल जाधव याने मात्र साऱ्या देशवासियांना कडक सलाम ठोकावा अशी कामगिरी केली आहे. कुणाल जाधव हा गेल्या 17 वर्षांपासून माझगावच्या जीएसटी भवनात शिपाई पदावर कार्यरत करत आहे. झाले असे की, जीएसटी भवनाच्या नवव्या मजल्याला सोमवारी सव्वा बाराच्या सुमारास भीषण आग लागली. धुराचे लोळ निघताच कर्मचाऱ्यांना आपापल्या मजल्यावरून खाली जायला सांगितलं. जिथे सगळे कर्मचारी आपल्या घरी जात होते, तिथे मात्र कुणालसारखे 10-12 जण मात्र पार्किंगमधील गाड्या हटवण्यासाठी प्रयत्न करत होते. अग्निशमन दलाच्या गाड्यांना रस्ता करून देण्यासाठी ही सगळी कसरत होती. पण तितक्यात कुणालाच्या मागून आवाज आला, अरे तिरंग्याचं काय? कुणालने क्षणाचाही विचार न करता तो झरझर जिन्याकडे धावला. आठ मजले तो एका दमात चढला खरा. पण जिथे आग लागली हाती त्या नवव्या मजल्यावर जाताच धुराचे लोळ त्याच्याकडे येऊ लागले. कुणालने पर्वा न करता मजले चढायला सुरुवात केली. तिथे त्याच आणखी 2 साथीदार त्याला भेटले. मग या तिघांनी तिरंग्याला सन्मानपूर्वक खाली उतरला आणि आपल्या खांद्यावर टाकून थेट तो पहिला मजल्यापर्यंत आला. कुणालची कामगिरी एखाद्या वीराला शोभेल अशीच आहे. कुणाल जाधव या शिपाईच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा।। शान ना इसकी जाने पाये, चाहे जान भलेही जाये।। हे नुसतं ध्वजगीत नाही, तर ही झेंड्याप्रती भारतीयांची भावना आहे. आणि कुणाल ने आज हे सिद्ध केलं. दरम्यान, माझगाव येथील जीएसटी भवनात आज सव्वाबाराच्या सुमारास आग लागली. त्यावेळी सुमारे 3500 कर्मचारी इथे काम करत होते. वरचे 2 मजले रिकामे होते. म्हणजे 8 मजल्यावरून सगळे कर्मचारी इमारतीतून बाहेर पडत होते. एकटा कुणाल त्यावेळी जिने चढत वर जात होता. कुणालने प्रसंगावधान राखत तिरंग्याला आगीची, धुराची झळ बसू न देता सुरक्षित बाहेर आणण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या