JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत; उद्योगमंत्र्यांना रद्द करावा लागला रत्नागिरी दौरा

कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत; उद्योगमंत्र्यांना रद्द करावा लागला रत्नागिरी दौरा

पहाटे 1 वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रात्री धावणाऱ्या महत्वाच्या सहा एक्सप्रेससह सर्वच गाड्या चार ते पाच तास रखडल्या आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रत्नागिरी 25 नोव्हेंबर : कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ओव्हर हेड एक्युपमेंट वायर तुटली आहे. यामुळे पहाटे 1 वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रात्री धावणाऱ्या महत्वाच्या सहा एक्सप्रेससह सर्वच गाड्या चार ते पाच तास रखडल्या आहेत. सर्व गाड्या इलेक्ट्रिक इंजिनवर धावत असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. लातूरमध्ये विचित्र अग्नितांडव, टँकरचा उडाला भडका, 7 गाड्या जळून खाक वेरावल - त्रिवेंद्रम एक्सप्रेसही 4 तास 24 मिनिटं उशिरा आहे. कोकण कन्या एक्सप्रेस 3 तास 30 मिनिटं उशिरा असून ही गाडी वीर स्थानकात थांबवली आहे. सावंतवाडी एक्सप्रेस गेल्या तीन तासापासून करंजाडी स्थानकात थांबली आहे एलटीटी मडगाव एक्सप्रेस साडेतीन तासापासून सापे वामने स्थानकात थांबवण्यात आली आहे, सिएसटीएम - मेंगलोर एक्सप्रेस साडेपाच तासापासून दिवाणखवटी स्थानकात थांबवली आहे मत्स्यगंधा एक्सप्रेस साडेचार तासांपासून सापे वामणे स्थानकात थांबवण्यात आली आहे कोकण रेल्वे प्रशासनाकडून इलेक्ट्रिकऐवजी डिझेल इंजिनची उपलब्धता करून हळूहळू एक्सप्रेस मार्गस्थ करण्यात येत आहेत धक्कादायक! ठाण्यात गोवरचा कहर, चार रुग्णांचा मृत्यू राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे याच कोकण कन्या एक्सप्रेसने मुंबईहून रत्नागिरीकडे येत होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मंत्री उदय सामंत हे पुन्हा मुंबईच्या दिशेने परतलेले आहेत. त्यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा रद्द झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सामंत यांचा आजचा नियोजित दौरा होता, तो रद्द झाल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्व एक्सप्रेस गाड्यांमधील प्रवासी रात्रभर विविध स्थानकात अडकून आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या