JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / konkan flood : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीस-राणे कोकणाच्या दौऱ्यावर

konkan flood : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीस-राणे कोकणाच्या दौऱ्यावर

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा कोकणातच असून उद्याच एकाच दिवशी तिन्ही नेते चिपळूणमध्ये पाहणी करणार आहे.

जाहिरात

'मुळात वातावरण चिघळवण्याची सुरुवात राणेंनी केली. त्यामुळे त्यांना अटकाव घालणे आवश्यक होतं'

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जुलै : कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट (maharashtra flood news) कोसळले आहे. रायगड (raigad), रत्नागिरीसह (ratnagiri) संपूर्ण कोकणात (konkan flood ) अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुर्घटनाग्रस्त गावांची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहे. आता त्यांच्यापाठोपाठ भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) आणि केंद्रीय लघुउद्योग मंत्री नारायण राणे (narayan rane) सुद्धा उद्या कोकणाच्या दौऱ्यावर पोहोचणार आहे. कोकणात पावसाने थैमान घातले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी आणि नागरिकांचं सांत्वन करण्यासाठी  माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकणाचा रविवारी दौरा करणार आहे. त्यांच्यासोबत नारायण राणे सुद्धा असणार आहे. नारायण राणे यांनी नुकतेच केंद्रीय मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर नारायण राणे हे नवी दिल्लीतच मुक्कामी होते. पण, आता कोकणावरच अस्मानी संकट कोसळल्यामुळे राणे उद्या कोकणात दाखल होणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता नारायण राणे हे फडणवीस यांच्यासह महाड, खेड आणि चिपळूणचा दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा कोकणातच असून उद्याच एकाच दिवशी तिन्ही नेते चिपळूणमध्ये पाहणी करणार आहे. आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव यांनी घटनास्थळाचा पाहणी दौरा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे, अनपेक्षित दुर्घटना घडत आहेत. यातून आपल्याला शिकण्याची गरज आहे. आजकाल पावसाळ्याची सुरुवात सुद्धा चक्रीवादळाने होते. तळीयेतील गावकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. सरकार त्यांना सर्व मदत करेल, संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचे योग्य पुनर्वसन करू. अशा घटना पाहता डोंगर उतार आणि कडे- कपाऱ्यात राहणाऱ्या वाड्या- वस्त्या यांना स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात येईल.’ ‘ही आपत्ती इतकी मोठी होती की मदतीला त्याठिकाणी पोहताना जवानांना आणि पथकाला अडचणी आल्या. कारण सगळ्या सामुग्रीनिशी त्यांना बचाव कार्य करायचे होते. राज्य शासन आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी तयार होते. केंद्राने देखील सहाय्य केले, लष्कर, एनडीआरएफ सर्वांनीच मदत केली आहे’ असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या