JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Weather Update Winter Season : राज्यात पुढील 8 दिवस थंडीची लाट, मुंबईसह अन्य जिल्ह्यात इशारा, असा असेल अंदाज

Weather Update Winter Season : राज्यात पुढील 8 दिवस थंडीची लाट, मुंबईसह अन्य जिल्ह्यात इशारा, असा असेल अंदाज

राज्यात सध्या वातावरणात बदल होत असल्याने कधी थंडीची लाट तर कधी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 डिसेंबर : राज्यात सध्या वातावरणात बदल होत असल्याने कधी थंडीची लाट तर कधी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या आकाश कोरडे असल्यान पावसाची शक्यता कमी झाली आहे परंतु निरभ्र आकाश असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. तर किमान तापमानात घट झाल्याने गारठाही वाढला आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढल्याने पहाटे गारठा, तर दुपारी चटका, अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. आज (ता. 22) राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने मागच्या 24 तासांत धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी 10 अंश, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 10.1 अंश, औरंगाबाद येथे 10.2 अंश, निफाड येथे 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा 11 ते 20 अंशांच्या दरम्यान होता. तर रत्नागिरीत राज्यातील उच्चांकी 34.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 30 अंशांच्या पार आहे. कमाल आणि किमान तापमानातही 11 अंशांपर्यंतची तफावत दिसून येत आहे.

हे ही वाचा :  मुंबईसह राज्यातील अनेक शहरात गारठा वाढला, नाताळला थंडीचा जोर आणखी वाढणार

संबंधित बातम्या

राजस्थानातील चुरू येथे देशाच्या सपाट भू-भागावरील नीचांकी 5.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील पंजाब, हरियाना, राजस्थान या राज्यांमध्येही थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा आहे. तर हरियाना, चंडीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशात दाट धुक्याची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

जाहिरात

पुढील 8 दिवस थंडीची लाट

पुढील आठ दिवस राज्यात थंडीची लाट राहणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेती कामे करताना, रात्री अपरात्री शेतात जाताना, रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी जाताना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. या थंडीच्या तीव्र लाटेमुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते.

हे ही वाचा :  राज्यभर थंडीची चाहूल इथं चेक करा तुमच्या शहराचं तापमान

जाहिरात

रब्बी हंगामातील गहू पिकास थंडीचे वातावरण चांगले राहणार असले तरी देखील द्राक्ष सारख्या बागायती पिकांना याचा फटका बसू शकतो.  यामुळे निश्चितच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची काळजाची धडधड वाढली आहे. परंतु पाऊस कोसळणार नाही तसेच हवामान नीरभ्र राहील यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा देखील मिळाला आहे. पण थंडीची तीव्र लाट येणार असल्याचा अंदाज असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या