JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गौरीच्या मुखवट्याला घातले सात तोळे सोन्याचे दागिने, चोरट्यांनी साधला डाव अन्..

गौरीच्या मुखवट्याला घातले सात तोळे सोन्याचे दागिने, चोरट्यांनी साधला डाव अन्..

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 5 सप्टेंबर : राज्यात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे. मात्र, सणासुदीमध्ये चोरटे आपले हात साफ करताना दिसत आहेत. मालेगावमध्ये अशीच एक धक्क्दायक घटना समोर आली आहे. गौरीच्या मुखवट्याला घातलेले सात तोळ्यांचे दागिने चोरट्यानी लंपास केले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पन्हाळा तालुक्यातील मालेगावात ही घटना घडली आहे. ऐन सणासुदीच्या काळात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घरातील लोक झोपेत असताना चोरट्यानी कडी कोयंडा उचकटला आणि घरात प्रवेश केला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 5 सप्टेंबर : राज्यात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे. मात्र, सणासुदीमध्ये चोरटे आपले हात साफ करताना दिसत आहेत. मालेगावमध्ये अशीच एक धक्क्दायक घटना समोर आली आहे. गौरीच्या मुखवट्याला घातलेले सात तोळ्यांचे दागिने चोरट्यानी लंपास केले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पन्हाळा तालुक्यातील मालेगावात ही घटना घडली आहे. ऐन सणासुदीच्या काळात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घरातील लोक झोपेत असताना चोरट्यानी कडी कोयंडा उचकटला आणि घरात प्रवेश केला. अरुण चौगले यांच्या घरी ही चोरी झाली आहे. विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा घरातील लोक झोपले होते. याचाच चोरट्यांनी फायदा घेत आपला डाव साधला. अरूण चौगले हे कामावरून घरी परत आले. आणि यानंतर त्यांनी आपल्या घरातील सदस्यांना फोन केला. त्यांचा आवाज ऐकल्याने चोरटे पळून गेले. दरम्यान, चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला. चोरट्यानी घरातील तिरोजीवरही डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. हेही वाचा -  प्लास्टिक बॅगविरोधी पथकातील कर्मचाऱ्याला दुकानदाराकडून जबर मारहाण, पिंपरी चिंचवडीमधील धक्कादायक VIDEO याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. तसेच पोलीस श्वान पथकाच्या मदतीने तपास करत आहेत. मात्र, सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या