JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कार आणि बाईकच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू, भयानक दृश्य CCTV मध्ये कैद

कार आणि बाईकच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू, भयानक दृश्य CCTV मध्ये कैद

या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 11 जुलै : कोल्हापुरातील धैर्यप्रसाद चौक ते सदर बाजार रस्त्यावर भीषण अपघात झाला. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताचं भयानक दृष्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. धैर्यप्रसाद चौक ते सदर बाजार या दरम्यान रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकीला समोरून आलेल्या कारने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील व्यक्ती लांब उडून पडली. तर कारही रस्ताच्या दुसऱ्या बाजूला जावून धडकली. यामध्ये दुचाकीवरील वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. पुरोषात्तम बालीगा असं मृताचं नाव आहे. या अपघातात अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज सकाळी हा अपघात झाला असून अपघाताची भयानक दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. दुचाकीला धकड दिल्यानंतर कार सुद्धा पलटी झाल्याचं सीसिटीव्ही मध्ये दिसत आहे. या अपघातात दोन्ही वाहनांच मोठं नुकसान झालं आहे. या भीषण अपघाताची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान, लॉकडाऊन काळात रस्ते ओस पडल्यानंतर अपघातांच्या घटनेत मोठी घसरण झाली होती. मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू होऊन प्रवासासाठी सूट देण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा जोरदार वेगाने वाहने रस्त्यावरून धावू लागली आहेत. परिणामी अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या