JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढणार; 'त्या' प्रकरणाचा तपास CBI कडे?

जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढणार; 'त्या' प्रकरणाचा तपास CBI कडे?

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्वाळ्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती समोर येत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 नोव्हेंबर : माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत आता पुन्हा वाढ होणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट केली म्हणून अनंत करमूसेला केलेली मारहाण आव्हाडांना भोवणार आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काल महत्त्वाचा निर्वाळा दिला आहे. तत्कालीन सरकारने या प्रकरणात तपास योग्य पद्धतीने न केल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. ‘राज्यपालांची हकालपट्टी करा’; गडकरी, फडणवीसांच्या नागपुरातील माजी भाजप आमदाराची मागणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्वाळ्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती समोर येत आहे. याच प्रकरणात मदत केल्यामुळे अनंत करमूसे आज किरिट सोमय्या यांची भेट घेणार आहेत. तसंच पुढील कायदेशीर लढाईत सहकार्य करावं यासाठी किरिट सोमय्या यांचं मार्गदर्शनही घेणार आहेत. अनंत करमुसे यांचे अपहरण आणि मारहाण प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडे दिली जाऊ शकते. काय आहे प्रकरण - अनंत करमुसे यांनी एप्रिल 2020 मध्ये तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेलं. त्यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे यांना बेदम मारहाण केली होती. यावेळी याठिकाणी जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. ‘मला मंत्रिपद हवं आहे, म्हणून…’; गुवाहाटी दौऱ्याआधी आमदार संतोष बांगर यांची प्रतिक्रिया या घटनेनंतर करमुसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटकही केली होती. मात्र, नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्वाळ्यानंतर आव्हाड यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या